विमान तिकिटाचे पैसे परत करण्याच्या नावाखाली फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:07 AM2021-01-25T04:07:28+5:302021-01-25T04:07:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : विमान तिकिटाचे पैसे परत करण्याच्या नावाखाली व्यावसायिकाची ३२ हजार ८८९ रुपयांची फसवणूक करण्यात आली. ...

Fraud in the name of refunding air tickets | विमान तिकिटाचे पैसे परत करण्याच्या नावाखाली फसवणूक

विमान तिकिटाचे पैसे परत करण्याच्या नावाखाली फसवणूक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : विमान तिकिटाचे पैसे परत करण्याच्या नावाखाली व्यावसायिकाची ३२ हजार ८८९ रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी माहीम पोलीस अधिक तपास करत आहेत.

माहीम परिसरात राहणारे ४० वर्षीय तक्रारदार यांचा ट्रॅव्हल एजन्सीचा व्यवसाय आहे. त्यांच्या पत्नीने मुंबई ते कोलकाता प्रवासासाठी पाच हजार ३४५ रुपयांचे फोन पे वरून विमान तिकीट बुक केले. मात्र, वेळेत तिकीट तयार न झाल्याने त्यांनी ते रद्द केले. तिकिटाचे पैसे परत घ्यायचे असल्याने त्यांनी गुगलवरून फोन पे च्या ग्राहक सेवेचा क्रमांक मिळवला. त्यावर पैसे रिफंड मिळण्यासाठी काय करावे लागणार, याबाबत विचारणा केली. पुढे ठगाने सांगितल्याप्रमाणेे प्रोसेस करत असताना त्याने २९,८९० हा अंक टाकण्यास सांगितले.

ताे टाकताच त्यांच्या खात्यातून ती रक्कम वजा झाली. पुढे आणखी २,९९९ हा अंक टाकण्यास सांगताच ते पैसे कमी झाले. यात एकूण ३२ हजार ८८९ रुपये गेल्याने त्यांना संशय आला. त्यांनी पैसे परत करण्यास सांगताच ठगाने फोन बंद केला. याप्रकरणी माहीम पोलीस अधिक तपास करीत आहेत.

.....................

Web Title: Fraud in the name of refunding air tickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.