पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 02:07 AM2017-12-26T02:07:56+5:302017-12-26T02:08:03+5:30

मुंबई : पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवत, एका इसमाची लाखोंची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार गोराई परिसरात घडला.

Fraud showing the lure of doubling the money | पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून फसवणूक

पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून फसवणूक

Next

मुंबई : पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवत, एका इसमाची लाखोंची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार गोराई परिसरात घडला. रविवारी या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांचा शोध सुरू आहे.
रोहिदास भंडारी (४२) असे या प्रकरणातील तक्रारदाराचे नाव आहे. सप्टेंबर २०१३मध्ये भंडारी यांची ओळख दोन इसमांशी झाली. इन्कम टॅक्स अधिकारी असल्याचे त्यांनी सांगितले. धाड टाकण्यासाठी लागणाºया कामात गुंतवणूक करा, आम्ही तुम्हाला पैसे दुप्पट करून देऊ, असे आमिष त्यांनी भंडारी यांना दिले. ही बाब खरी वाटल्याने भंडारी यांनी त्यांना रोख रक्कम आणि दागिने असे मिळून २३ लाख ५० हजार रुपये दिले. त्यानंतर, दोघांनी भंडारी यांना एक चेक दिला. मात्र, प्रत्यक्ष बँकेत जेव्हा तो चेक भंडारी यांनी टाकला, तेव्हा संबंधित खात्यात पैसेच नसल्याने तो चेक बाउन्स झाला. तेव्हा भंडारी यांनी दोन इसमांना त्याबाबत विचारणा केली. मात्र, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे भंडारी यांनी या प्रकरणी गोराई पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला.

Web Title: Fraud showing the lure of doubling the money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.