अभिनेते अन्नू कपूर यांना लाखोंचा गंडा; गोल्डन अवरमुळे पैसे मिळाले परत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2022 05:56 AM2022-10-02T05:56:29+5:302022-10-02T05:57:18+5:30
अभिनेते अन्नू कपूर यांची तीन लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली.
लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अभिनेते अन्नू कपूर (६६) यांची तीन लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. मात्र त्यांनी गोल्डन अवरमध्ये ओशिवरा पोलिसात तक्रार दाखल केल्यामुळे पैसे परत मिळाले.
ओशिवरा पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या विंडर मेअर इमारतीत कपूर राहतात. एचएसबीसी बँकेत अन्नू कपूर यांचे खाते आहे. त्यांना २९ सप्टेंबर रोजी ८२४९२५३८३२ या क्रमांकावरून कृष्णकुमार रेड्डी नावाने फोन आला. एचएसबीसी बँकेच्या हेड ब्रांच मधून बोलत असल्याचे सांगत कपूर यांना त्यांच्या बँक खात्याचे केवायसी करणे बाकी असल्याचे सांगितले. तसेच केवायसी न केल्यासखाते बंद होईल अशी भीतीही दाखवली.
अशी केली फसगत…
केवायसीसाठी रेड्डीने कपूर यांना बँकेचे खाते क्रमांक व मोबाइलवर येणारा ओटीपी क्रमांक इ. मागितले. कपूर यांनी तसे करताच बँकेचे केवायसी अपडेट झाल्याचे रेड्डीने सांगितले. मात्र, बँकेने कपूर यांना त्यांच्या खात्यातून तीन लाख आठ हजार रुपये काढले गेल्याचे सांगितले. त्यानंतर कपूर यांना फसगत झाल्याचे समजले. त्यांनी तातडीने पोलिसांना कळवले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सीमा सकुंडे, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर कुरकुटे, पोलीस अंमलदार अशोक कोंडे, विक्रम सरनोबत यांनी गुन्ह्याचा छडा लावला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"