Join us

केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने फसविणाऱ्याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 4:07 AM

मुंबई : केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने दक्षिण मुंबईतील एका व्यापाऱ्याला फसवणाऱ्या आरोपीस डी.बी. मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. बद्री ...

मुंबई : केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने दक्षिण मुंबईतील एका व्यापाऱ्याला फसवणाऱ्या आरोपीस डी.बी. मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. बद्री मोंडल (२५) असे या आरोपीचे नाव असून तो सायबर गुन्ह्यांचे केंद्र असणाऱ्या जामतारा येथील रहिवासी आहे. बद्री मंडल हा काही वर्षांपूर्वी मुंबईच्या जुहू चौपाटीवर भेलपुरी विकायचा. २०१९ साली दक्षिण मुंबईतील एका व्यापाऱ्याला त्याने केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने संपर्क साधला. यावेळी त्या व्यापाऱ्याला एक ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगून त्या व्यापाऱ्याच्या फोनचा ताबा बद्री याने मिळवला. यानंतर त्या व्यापाऱ्याच्या बँक अकाउंटमधून १ लाख ७० हजार रुपये काढले. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र लॉकडाउनमुळे या शोधकार्यात अडथळा निर्माण झाला. यानंतर जामतारा पोलिसांनी या आरोपीस अटक केल्याचे पोलिसांना कळले. जामतारा पोलिसांनी आरोपीकडून एक दुचाकी व एक चारचाकी जप्त केली. मुंबईत विविध पोलीस ठाण्यांमध्ये या आरोपीवर एकूण आठ गुन्हे दाखल असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.