मुंबई : अमेरिकन डॉलर स्वस्तात देण्याचे आमिष दाखवत दोन व्यापाऱ्यांची फसवणूक केल्याचा प्रकार अंधेरीत घडला होता. या प्रकरणी मेघवाडी पोलिसांनी एका महिलेसह तिघांना अटक केली आहे. मेघवाडी पोलिसांनी बानू शेख उर्फ माया (४५), समीर उर्फ सोहेल खान (२६) आणि मोहम्मद मौला उर्फ मुस्तफा मोहम्मद आलम व्यापारी (२८) या तिघांना अटक केली आहे.
‘आमची मावशी कुलाब्यात एका शेठकडे काम करीत होती. त्या शेठला त्यांचे घर विकायचे असल्याने घरातील सामान त्यांनी मावशीला दिले. त्या सामानात तिला अमेरिकन डॉलर सापडले. मावशी वेडसर आहे. त्यामुळे ते आम्ही तुम्हाला स्वस्तात देऊ, असे आमिष या टोळीने यातील फिर्यादी ऐहतेशाम हैदर आणि त्यांच्या मित्राला दाखवले. तसेच त्यांना एक २० अमेरिकन डॉलरची नोटही दिली. ते डॉलर बाजारात चालल्याने या टोळीच्या बोलण्यावर हैदर यांचा विश्वास बसला. त्यांनी आणि त्यांच्या मित्राने ५ लाख ३० हजार रुपये या टोळीला दिले. त्या बदल्यात त्यांनी हैदर यांना नोटांचे बंडल दिले आणि पसार झाले. त्यात पहिली आणि शेवटची नोट अमेरिकन होती. हैदर यांच्या हे लक्षात आले आणि २३ जुलै २०१९ रोजी त्यांनी या प्रकरणी मेघवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी तपासाअंती महिलेसह तिघांना अटक केली.३१ जुलैपर्यंत पोलीस कोठडीच्पोलिसांना पुरावे सापडू नयेत म्हणून ही टोळी कटड या अॅपवरून आपापसांत बोलायची. मात्र त्याआधी ते मायाच्या संपर्कात असल्याचे सीडीआर अहवालात उघड झाले. त्यानुसार मायाला कल्याण शिळफाटा, खानला तुर्भे एमआयडीसी आणि आलम याला तुर्भेतून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून १५ हजार ९०० ची रोख रक्कम, २० अमेरिकन डॉलरच्या पाच नोटा आणि सात मोबाइल हस्तगत करण्यात आले आहेत. च्त्यांना न्यायालयाने ३१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांनी या अमेरिकन नोटा कुठून आणल्या? याबाबत पोलीस चौकशी करीत आहेत.