ॲनिमल रेस्क्युची फसवी लिंक; भटक्या श्वानाचे आजारपणात हजारोंचा फटका
By गौरी टेंबकर | Published: October 17, 2023 12:11 PM2023-10-17T12:11:50+5:302023-10-17T12:12:03+5:30
पैसे पाठवल्यावर फसवणुकीचा प्रकार असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी बँकेला त्वरित कळवत त्यांचा युपीआय बंद करायला सांगितले.
मुंबई - स्थानिक परिसरात भटक्या आजारी श्वानाला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यास सांगण्याच्या नादात एका मेडिकल स्टोअर चालकाला हजारोंचा फटका बसला आहे. हा प्रकार वांद्रे पश्चिम परिसरात घडला असून या विरोधात अनोळखी व्यक्ती विरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रारदार मुबशेररूद्दिन काझी (५०) यांचे वांद्रे पूर्वच्या भारतनगर परिसरात एक मेडिकल स्टोअर आहे. ते राहत असलेल्या परिसरात एक क्षण खूप आजारी असल्याने त्याला उपचारासाठी नेण्याबाबत काझी यांनी डॉग रेस्क्यू टीमच्या नावाने असलेल्या क्रमांकावर फोन केला होता. त्यानंतर त्यांना इंग्रजीमध्ये ॲनिमल रेस्क्यू टीम डॉट एपीके अशी लिंक पाठवण्यात आली. त्यावर क्लिक करून पाच रुपये भरायला सांगितले. मात्र त्यांनी पैसे पाठवल्यावर फसवणुकीचा प्रकार असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी बँकेला त्वरित कळवत त्यांचा युपीआय बंद करायला सांगितले. त्यामुळे त्यांच्या खात्यात पैसे येऊ शकत होते मात्र बाहेर जाऊ शकत नव्हते.
दरम्यान ते राहत असलेल्या वांद्रे पश्चिम येथील परिसर डेव्हलपमेंटला गेल्यामुळे ते बिल्डर महिन्याला १५ हजार प्रमाणे ११ महिन्यांचे भाडे १ लाख ६५ हजार जमा करतो. पैशाची गरज असल्याने काझी यांनी ४८ हजार सेल्फ चेकने काढले. तसेच यूपीआय सुरू करण्यासाठी अर्ज ही दिला आणि एका मित्राला काही रक्कम गुगल पे केली. त्याच्या काही वेळाने काझी यांच्या खात्यातून ८४ हजार, ९९९ रुपये काढण्यात आले आणि या प्रकरणी त्यांनी वांद्रे पोलिसात तक्रार दिली