ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण केंद्रावर जाण्यासाठी मोफत बस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:06 AM2021-03-15T04:06:02+5:302021-03-15T04:06:02+5:30
मुंबई- कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लसीकरणासाठी दहिसर जम्बो कोविड सेंटर येथे जाता यावे याकरिता मोफत बसची ...
मुंबई- कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लसीकरणासाठी दहिसर
जम्बो कोविड सेंटर येथे जाता यावे याकरिता मोफत बसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ही मोफत बस
उपलब्ध करून दिली आहे. कांदिवली पूर्व येथील चाणक्यनगर येथे या सुविधेचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. या विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक वॉर्डमधून ज्येष्ठ नागरिकांसाठी सदर बससेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आमदार भातखळकर यांनी दिली.
ज्येष्ठांचा आशीर्वाद हीच पुण्याई मानून या सुविधेअंतर्गत पहिल्या टप्प्यात किमान 5 हजार ज्येष्ठ नागरिकांना मोफत बसची सुविधा उपलब्ध करून देण्याचा आपला मानस असून, लवकरच कांदिवली पूर्व व मालाड पूर्व परिसरात कोरोना लसीकरण केंद्र सुरू व्हावे, याकरिता प्रयत्नशील असल्याचे आ. अतुल भातखळकर यावेळी म्हणाले.