सिद्धिविनायकला जाणाऱ्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, दर मंगळवारी मिळणार मोफत विशेष बससेवा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2018 10:24 AM2018-01-23T10:24:38+5:302018-01-23T10:25:16+5:30
सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी मंगळवारी पहाटे पोहोचणाऱ्या भक्तांकरता एक आनंदाची बातमी आहे.
मुंबई- सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी मंगळवारी पहाटे पोहोचणाऱ्या भक्तांकरता एक आनंदाची बातमी आहे. आजपासून दर सोमवारी मध्यरात्री 12 वाजेपासून ते मंगळवार रात्री 12 वाजेपर्यंत एल्फिन्स्टन स्टेशनवरुन मंदिरापर्यत मोफत विशेष बससेवेची सुविधा देण्यात येणार आहे. त्यामुळे सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जाणाऱ्या भक्तांना या विशेष बससेवेचा फायदा होणार आहे.
सध्या माघी गणेशोत्सव सुरु आहे, यानिमित्ताने सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी याबद्दलची माहिती दिली. माघी गणोशोत्सवाच्या निमित्ताने बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची जास्त रेलचेल असते. त्यामुळे गणेशभक्तांना ही बससेवा विषेश उपयोगाची ठरणार आहे.
आज (सोमवार) रात्री १२ वाजता या सेवेचा शुभारंभ सिद्धिविनायक मंदीर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्या हस्ते होणार आहे. सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या या उपक्रमामुळे दर मंगळवारी मोठ्या संख्येने येणाऱ्या गणेशभक्तांना मोठी सुविधा मिळणार आहे.