Join us

लहान मुलांसाठी जे.जे.मध्ये स्वतंत्र कर्करोग विभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 6:25 AM

देशासमोरील कर्करोगाचे आव्हान पाहता, जे.जे. रुग्णालयाने कर्करोगाविषयी नुकतेच महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

मुंबई : देशासमोरील कर्करोगाचे आव्हान पाहता, जे.जे. रुग्णालयाने कर्करोगाविषयी नुकतेच महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. लहानग्यांना होणाऱ्या कर्करोगाविषयी एका संस्थेच्या साहाय्याने जे.जे. रुग्णालय प्रशासनाने स्वतंत्र विभाग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लवकरच शासकीय रुग्णालयात अल्प दरात लहानग्या कर्करोग रुग्णांना उपचार मिळणे सोपे होईल.कॅनकिड्स या नॅशनल सोसायटी आॅफ चेंज चाइल्डहूड कॅन्सर संस्थेशी जे़ जे़ रुग्णालयाने सामंजस्य करार केला आहे. त्या माध्यमातून लहानग्यांमध्ये दिसून येणाºया कर्करोगाविषयी विविध उपक्रमही राबविण्यात येणार आहे. यावेळी कॅनकिड्सचे सहसंचालक मुकुंद मारवा यांनी सांगितले की, बºयाचदा लहानग्या रुग्णांमध्ये कर्करोगाचे निदान उशिराने होते. उपचारांसही विलंब होतो,हे टाळण्यासाठी प्रत्येक रुग्णालयात उपचार उपलब्ध झाले पाहिजे. त्या दृष्टिकोनातून जे.जे. रुग्णालय प्रशासनसह येत्या काळात काम करणार आहोत. शिवाय, या क्षेत्रातील संशोधनाला बळकटी मिळण्यासाठीही विविध पातळ्यांवर प्रयत्न करण्यात येणार आहे.देशात दरवर्षी जवळपास ४० ते ५० हजार मुले कर्करोगाने ग्रस्त होतात. यामधील बहुतांश रुग्ण योग्य मार्गदर्शनाच्या अभावाने उपचारांना मुकतात. याबद्दल समाजात जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे. रक्ताचा कर्करोग (ल्युकेमिया आणि लाइमफोमा) सर्वांत जास्तप्रमाणात आढळतो. या व्यतिरिक्त मेंदूचा, मूत्रपिंडाचा, यकृताचा, हाडांचा असा इतर अवयवांचाही कर्करोग होऊ शकतो, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे सहसंचालक डॉ. प्रकाश वाकोडे यांनी दिली.