Join us

‘नायर’मध्ये कर्करोग्यांना मोफत समुपदेशन

By admin | Published: July 17, 2014 1:09 AM

कर्करोग झाल्यानंतर रुग्णांना उपचाराच्या बरोबरीनेच समुपदेशनाची गरजही असते. कर्करोग रुग्णांच्या नातेवाइकांना आणि रुग्णांना त्यांच्यावर होणारे उपचार, त्याचे दुष्परिणाम समजावून सांगावे लागतात.

मुंबई : कर्करोग झाल्यानंतर रुग्णांना उपचाराच्या बरोबरीनेच समुपदेशनाची गरजही असते. कर्करोग रुग्णांच्या नातेवाइकांना आणि रुग्णांना त्यांच्यावर होणारे उपचार, त्याचे दुष्परिणाम समजावून सांगावे लागतात. नायर रुग्णालयात सुरू केलेल्या कर्करोग विभागामध्ये आता रुग्णांचे मोफत समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आले आहे. भारतामध्ये कर्करोग रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. परेलच्या टाटा रुग्णालयावर कर्करोग रुग्णांचा भार पडत आहे. कर्करोग रुग्णांना दुसऱ्या ठिकाणीही माफक दरात उपचार मिळावे, या विचाराने महापालिकेने मार्च २०१३ मध्ये नायर रुग्णालयामध्ये कर्करोग उपचार विभाग सुरू केला. या विभागामध्ये आजच्या घडीला हजारो रुग्ण उपचार घेत आहेत.उपचार करून रोग बरा होऊ शकतो, मात्र मानसिक आधार मिळावा यासाठी समुपदेशनाची या रुग्णांना खूप गरज असते. येथे उपचार घेणाऱ्या रुग्णांचे समुपदेशन एका संस्थेच्या साहाय्याने केले जाणार आहे, असे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले. (प्रतिनिधी)