ठाणे : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वल योजने (पीएमयूवाय) अंतर्गत ठाणे जिल्ह्याच्या पाच तालुक्यांतील ५६ हजार ४८६ कुटुंबीयांची मोफत एलपीजी गॅस कनेक्शनसाठी निवड करण्यात आली आहे. या कुटुंबीयांची माहिती संकलित करण्याचे काम जिल्ह्यात संबंधित तहसीलदारांकडून युद्धपातळीवर सुरू केले आहे. महापालिका, नगरपालिका आणि गावखेड्यातील बीपीएल शिधापत्रिकाधारक कुटुंबीयांना याचा लाभ दिला जाणार आहे. यात निवड झालेल्यांमध्ये शहापूर तालुक्यातील सर्वाधिक २१ हजार ३०२ कुटुंबांचा समावेश आहे. मुरबाड तालुक्यातील १४ हजार ८३२, भिवंडीतील १४ हजार ७२१, अंबरनाथमधील तीन हजार २२८, कल्याणमधील दोन हजार ३६३ कुटुंबांना कनेक्शनचा लाभ दिला जाणार आहे. (प्रतिनिधी)
५६ हजार कुटुंबीयांना मोफत गॅस कनेक्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2016 1:47 AM