सफाई कामगारांना मोफत घरे
By admin | Published: September 9, 2014 11:56 PM2014-09-09T23:56:21+5:302014-09-09T23:56:21+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेंतर्गत भार्इंदरपाडा व माजिवडा येथे बांधलेल्या २९० सदनिकांचे वाटप आचारसंहितेच्या अगोदर लॉटरी पद्धतीने करण्यात येणार आहे.
नामदेव पाषाणकर, ठाणे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेंतर्गत भार्इंदरपाडा व माजिवडा येथे बांधलेल्या २९० सदनिकांचे वाटप आचारसंहितेच्या अगोदर लॉटरी पद्धतीने करण्यात येणार आहे.
२५ वर्षांपेक्षा अधिक वर्षे ठाणे महानगरपालिकेत सेवा केलेल्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी ही योजना असून सेवानिवृत्तीच्यावेळी किंवा सफाई कर्मचाऱ्यांचा सेवेत मृत्यू ओढवल्यास त्यांच्या वारसास या योजनेत २६९ चौरस फुटाचे हक्काचे घर मिळणार आहे.
शासनाच्या नगरविकास विभागाने ही योजना सुरु करण्यासंबंधीचे आदेश २००८ मध्ये ठाणे पालिकेस दिले होते. ती प्रत्यक्षात उतरवण्यास प्रशासनाला २९ मार्च २०११ उजाडले होते.
महासभेने या ठरावाला मंजुरी दिल्यानंतर ठेकेदाराने १८ महिन्यांत सदनिका बांधणे गरजेचे होते. परंतु, जागेचा ताबा उशिरा मिळाल्यामुळे इमारत बांधकाम करण्यास विलंब झाला आहे. मे. शायोना कॉर्पोरेशन कंपनी ही घरे उभारण्याचे काम करीत आहे.
३१ मार्च २०१४ पर्यंत सदनिका बांधून देण्याचे आदेश आयुक्त असिम गुप्ता यांनी ठेकेदाराला दिले असतानाही पाच महिने उशीर झाला आहे.