मुंबई : राज्यातील ४० ते ५० वर्षे या वयोगटांतील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांची दोन वर्षांतून एकदा, तर ५१ व त्यावरील वयोगटांतील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांची दरवर्षी वैद्यकीय तपासणी करण्याचा आणि त्यासाठी पाच हजार रुपये इतकी रक्कम देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
nशासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संस्थांमध्ये या चाचण्या केल्या जातील. मात्र, त्या ठिकाणी या चाचण्या उपलब्ध नसल्यास खासगी ठिकाणीही त्या करण्यात येणार आहेत. आजच्या निर्णयासाठी १०६ कोटी रुपयांच्या खर्चासही मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांना दिली.nराज्यात ४० ते ५० वर्षे वयोगटांत १ लाख ५४ हजार २५५, तर ५१ वर्षांवरील वयोगटात १ लाख ३३ हजार ७५० असे २ लाख ८८ हजार ००५ अधिकारी व कर्मचारी आहेत.
बैलगाडा शर्यतींमधील खटले मागे घेणारबैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्यामुळे दाखल खटले मागे घेण्यात येणार आहेत. हे खटले मागे घेण्यासाठी शर्यतीच्या घटनेत जीवितहानी झालेली नसावी, खासगी व सार्वजनिक मालमत्तेचे पाच लाख रुपयांपेक्षा अधिक नुकसान झालेले नसावे, या अटी असतील.
nअनुदानित कला संस्था कला संचालनालय नियंत्रणाखाली ३१ अशासकीय कला संस्थांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विविध सेवाविषयक लाभ देण्यास मंजुरी.nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा ही बंद करण्याऐवजी १०० टक्के राज्य योजना म्हणून राबविण्यास मान्यता.
हाफकिनमधील लस उत्पादनाला देणार वेगहाफकिन जीव औषध निर्माण महामंडळात कोवॅक्सिन लस उत्पादित करण्याच्या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात ११० दशलक्ष डोस उत्पादनासाठी १२६ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.
भत्त्याची वाढ अशी...राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या वाहतूक भत्त्याच्या दरात १ एप्रिलपासून सुधारणा होईल. एस-२० व त्यावरील वेतन स्तरातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना बृहन्मुंबई नागरी समूह, नागपूर नागरी समूह व पुणे नागरी समूहात ५,४०० रुपये व इतर ठिकाणी २,७०० रुपये, एस ७ ते एस १९ स्तरासाठी अनुक्रमे २,७०० व १,३५० रुपये, एस १ ते एस ६ स्तरासाठी १००० व ६७५ रुपये असा वाहतूक भत्ता दिला जाईल. एस १ ते एस ६ या वेतन स्तरामधील २४,२०० रुपये व त्यापेक्षा जास्त वेतनाच्या बृहन्मुंबई, नागपूर व पुणे नागरीमधील कर्मचाऱ्यांना २,७०० रुपये व इतर कर्मचाऱ्यांना १,३५० रुपये.