वर्सोव्याच्या दिव्यांग मुलांना दिली मोफत औषधे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:08 AM2021-06-16T04:08:38+5:302021-06-16T04:08:38+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्याचे पर्यावरण मंत्री व उपनगराचे पालक मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वर्सोवा येथील ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्याचे पर्यावरण मंत्री व उपनगराचे पालक मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वर्सोवा येथील अवर लेडी हेल्थमधील दिव्यांग मुलांसाठी शिवसेना युवासेना शाखा क्र ५९ व एकता मंचाचे अध्यक्ष प्राचार्य अजय कौल यांनी दोन महिन्यांसाठीची मोफत औषधे दिली.
शिवसेनेचे या विभागातील उपविभागप्रमुख राजेश शेट्ये यांच्या प्रमुख उपस्थितीत ही औषधे या शाळेतील ननकडे सुपूर्द करण्यात आली.
या आश्रमशाळेत सुमारे ६० दिव्यांग मुले आहेत. त्यांना महिन्याभरात १७,००० रुपयांची औषधे लागतात. याची दखल घेऊन पालिकेच्या बाजार-उद्यान समिती अध्यक्ष व प्रभाग क्र ५९च्या नगरसेविका प्रतिमा खोपडे, शाखाप्रमुख सतीश परब यांनी आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने फळे / बिस्किटे ऐवजी १ महिन्याची औषधे या दिव्यांग मुलांसाठी देण्याचा मानस जाहीर केला. त्याला एकता मंचाचे अध्यक्ष कौल यांनीही अजून एका महिन्याची औषधे देऊन या उपक्रमास मदत केली.
याप्रसंगी उपविभागप्रमुख राजेश शेट्ये, नगरसेविका प्रतिमा खोपडे व शाखाप्रमुख सतीश परब, महिला उपविभाग संघटक जागृती भानजी, शाखा संघटक बेबी पाटील, उपशाखाप्रमुख राजेश रासम, राजेश पुरंदरे, शंकर डांगळे, अश्विनी पाटील, युवासेनेचे स्वप्निल शिवेकर, लायना बुथेलो, ऋषिकेश कामत आदी युवासैनिक, शिवसैनिक उपस्थित होते.
............................................