रिक्षा स्टॅण्डवर महिलांसाठी स्वतंत्र रांग
By admin | Published: July 20, 2014 12:05 AM2014-07-20T00:05:19+5:302014-07-20T00:05:19+5:30
लाखाहून अधिक संख्येने रिक्षाने प्रवास करणा:या डोंबिवलीकर महिलांसाठी अधिकृत रिक्षा स्टॅण्डमध्ये स्वतंत्र रांगेचा प्रस्ताव विचाराधीन आहे.
Next
अनिकेत घमंडी - डोंबिवली
लाखाहून अधिक संख्येने रिक्षाने प्रवास करणा:या डोंबिवलीकर महिलांसाठी अधिकृत रिक्षा स्टॅण्डमध्ये स्वतंत्र रांगेचा प्रस्ताव विचाराधीन आहे. हा प्रस्ताव डोंबिवली शहर वाहतूक शाखेला रामनगर पोलीस ठाण्याने दिला असून त्या संदर्भातील महत्त्वपूर्ण बैठक शनिवारी घेण्यात आली. हा प्रस्ताव मान्य झाल्यास सध्याच्या प्रचंड गर्दीतून आणि काही पुरुष प्रवाशांच्या जाणूनबुजून धक्का देणो, यांसह अन्य प्रकारांमधून महिलांची सुटका होणार असल्याने या ठिकाणच्या महिलांसाठी ही खूशखबर आहे.
शहर वाहतूक पोलिसांच्या दालनात शनिवारी सकाळी 11 वाजता ही बैठक घेण्यात आली. त्यामध्ये साहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण एस. के. डुबल, रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिवरकर, आ. रवींद्र चव्हाण, शहर वाहतूक पोलीस अधिकारी एस. यादव यांच्यासह बहुतांशी सर्वच रिक्षा युनियनचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. सुविधेसह कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने त्यावर ही उपाययोजना असल्याचे बैठकीत पोलिसांनी स्पष्ट करून चर्चा करण्यात आली. शिवरकर यांनी प्रायोगिक तत्त्वावर रामनगर येथे असलेल्या एस. व्ही. रोडसह, सुनीलनगर, राजाजी पथ, नांदिवली, केळकर रोड, रामचंद्रनगर आदी भागांत जाणा:या रिक्षांचा मोठय़ा प्रमाणावर समावेश असतो. त्यामुळे या स्टॅण्डचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याने येथून शुभारंभ करून कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणो आवश्यक आहे. ही संकल्पना स्वागतार्ह असून तिची अंमलबजावणी होणो महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात आले. ही सोय करताना अन्य कोणाचीही गैरसोय होणार नाही, याचीही काळजी घेण्यात यावी, याकडेही लक्ष वेधण्यात आले. हा प्रस्ताव ट्रॅफिक विभागाचे विभागीय पोलीस आयुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी (औपचारिकतेसाठी) यांच्याकडे पाठवण्यात येणार आह़े याचा लाभ ज्येष्ठ नागरिक महिला, गरोदर माता, विकलांग महिलांसह विद्यार्थिनींना होईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
च्शहरात गर्दीच्या ठिकाणी नेमके किती नो-पार्किगसह अन्य बोर्ड आहेत. अस्तित्वात आहेत, यांची नोंद आहे की नाही, याची चाचपणी डुबल यांनी केली.
च्तोकडी माहिती शहर वाहतूक शाखेकडे असून त्या सर्वाची सद्यस्थिती काय आहे, हे सांगताना अनेक बोर्ड झाडाच्या फांद्यांमुळे झाकले गेले असून काही रस्ता रुंदीकरण कामात काढले आहेत.
च्ते अद्याप लावण्यात आलेले नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्याबाबतची माहिती पालिकेला देण्यासह ते तातडीने लावण्याची कार्यवाही करण्याच्या सूचनाही या वेळी देण्यात आल्या.
च्मध्य रेल्वेच्या काही निवडक स्थानकांमध्ये अशाच पद्धतीने महिलांसाठी स्वतंत्र तिकीट खिडक्यांची सोय करण्यात आली आहे. त्यांचा लाभ अनेक महिलांना होत असून त्यांच्यात या सुविधेचे समाधान आहे.