मुंबई : मुंबई-ठाण्यातील विविध परिसरांमध्ये असणाऱ्या भटक्या कुत्र्यांसाठी गुरुवारी प्राणी मित्रांनी रेबीज प्रतिबंधक लस शिबिरांचे आयोजन केले होते. अम्मा केअर फाउंडेशन (एसीएफ) आणि प्लँट अँड ॲनिमल वेल्फेअर सोसायटी -मुंबई (पॉज-मुंबई) यांनी मंगला पंडित यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संयुक्तरीत्या या रेबीज-प्रतिबंधक लस शिबिराचे आयोजन केले होते. पशुवैद्य डॉ. राहुल मेश्राम आणि डॉ. मनीष पिंगळे यांच्या देखरेखीखाली आणि मानद जिल्हा पशू कल्याण अधिकारी सुनीष सुब्रमण्यन यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले.
या शिबिरात स्वयंसेवक निशा कुंजू, हितेश यादव, अभिनेत्री संध्या मेहता आणि स्थानिक प्राणीमित्र सहभागी होते. अंधेरी येथे सुकन्या महाजन, पुनिता टाकसाळी मालाड येथे पीपल्स फॉर अॅनिमलच्या लता परमार, मीरा भाईंदर येथे राहुल खारवा, रीना चंदुरा, देवेंद्र परमार, मानसी राणावत भांडुप येथे प्राची पाटील, रायन साळधाना कुर्ला येथे माधवी जगदणकर या सर्वांनी विविध परिसरांमध्ये कुत्र्यांचे लसीकरण करण्यात मदत केली. आपल्या परिसरात आणि सोसायटीत भटक्या कुत्र्यांसाठी मोफत अँटी रेबीज लस शिबिर आयोजित करण्यासाठी एसीएफ पॉज-मुंबई हेल्पलाईन ९८३३४८०३८८ वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
फोटो आहे - भटके कुत्रे