हज कमिटी ऑफ इंडियाकडून राज्य सेवा परीक्षेसाठी मोफत निवासी प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:06 AM2021-03-08T04:06:52+5:302021-03-08T04:06:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक अधिकारी-कर्मचारी असोसिएशन व हज कमिटी ऑफ इंडिया यांच्या वतीने राज्य ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक अधिकारी-कर्मचारी असोसिएशन व हज कमिटी ऑफ इंडिया यांच्या वतीने राज्य सेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुस्लिम समाजातील हुशार व होतकरू विद्यार्थ्यांसाठी हज हाऊस येथे निवासी प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येत आहेत.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांना राज्य सेवा परीक्षेसाठी मोफत आणि दर्जेदार कोचिंग, पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षेसह मुलाखत परीक्षेचे परिपूर्ण मार्गदर्शन केले जाईल. त्यांच्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची अभ्यासिका, टेस्ट सिरीज, मोफत हॉस्टेल व जेवणाची व्यवस्था असेल. त्यांना महाराष्ट्रातील नामांकित प्राध्यापकांचे, प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन मिळेल. https://forms.gle/bWhhgFj9VnqBDNWQ9 या लिंकवर २५ मार्चपर्यंत अर्ज करायचा आहे. त्यांची २८ मार्चला ऑनलाइन प्रवेश परीक्षा घेऊन १०० उमेदवारांना गुणवत्तेच्या आधारे मुलाखतीसाठी बोलावले जाईल. ३० मार्चला होणाऱ्या मुलाखतीतून गुणानुक्रमे ३० विद्यार्थ्यांना निवासी प्रशिक्षण वर्गासाठी निवडले जाईल.
...............................