सरकारी कर्मचारी, पोलीस, रुग्णांसाठी मोफत रिक्षासेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 01:59 AM2020-04-27T01:59:31+5:302020-04-27T01:59:37+5:30

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी झटणारे डॉक्टर, नर्स, पोलीस, सरकारी कर्मचारी यांची गैरसोय होऊ नये म्हणून मोफत रिक्षासेवा देण्याचे काम रिक्षाचालक दत्ताराम इंगवले हे करत आहेत.

Free rickshaw service for government employees, police, patients | सरकारी कर्मचारी, पोलीस, रुग्णांसाठी मोफत रिक्षासेवा

सरकारी कर्मचारी, पोलीस, रुग्णांसाठी मोफत रिक्षासेवा

Next

मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी झटणारे डॉक्टर, नर्स, पोलीस, सरकारी कर्मचारी यांची गैरसोय होऊ नये म्हणून मोफत रिक्षासेवा देण्याचे काम रिक्षाचालक दत्ताराम इंगवले हे करत आहेत.
पोलीस, डॉक्टर, सरकारी कर्मचाऱ्यांकडून कुठल्याही प्रकारचे शुल्क ते घेत नाहीत. या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कामावरच्या ठिकाणावर जाण्यासाठी वाहन मिळत नाही, अशांना यामुळे दिलासा मिळत आहे. याबाबत सुदेश शेट्टी म्हणाले की, कोरोनाच्या संकटात पोलीस, सरकारी कर्मचारी यांना कामावर, तर वैद्यकीय कर्मचारी यांना वेळेत रुग्णालयात पोहोचणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत एका रिक्षाचालकाने पुढाकार घेतला आहे.
चेंबूरमधील घाटला परिसरात राहणारे दत्ताराम इंगवले हे पोलीस, वैद्यकीय कर्मचारी आणि सरकारी अधिकारी यांना मोफत सेवा देत आहेत.

Web Title: Free rickshaw service for government employees, police, patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.