वर्सोव्याच्या चिल्ड्रन वेल्फेअर शाळेची मोफत रोटी भाजी योजना, अभिनेत्री श्रीदेवीने केलं उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2018 01:37 PM2018-02-22T13:37:11+5:302018-02-22T13:37:21+5:30

वर्सोवा,यारी रोड येथील चिल्ड्रन वेल्फेअर शाळेच्या माध्यमातून मोफत रोटी भाजी योजना रस्त्यावरील गरिबांची भूक भागवत असून या योजनेला येथील डबेवाला विलास शिंदे याची साथ मिळाली आहे.

Free Roti-bhaji food service to versovas children welfare students | वर्सोव्याच्या चिल्ड्रन वेल्फेअर शाळेची मोफत रोटी भाजी योजना, अभिनेत्री श्रीदेवीने केलं उद्घाटन

वर्सोव्याच्या चिल्ड्रन वेल्फेअर शाळेची मोफत रोटी भाजी योजना, अभिनेत्री श्रीदेवीने केलं उद्घाटन

googlenewsNext

मुंबई- वर्सोवा,यारी रोड येथील चिल्ड्रन वेल्फेअर शाळेच्या माध्यमातून मोफत रोटी भाजी योजना रस्त्यावरील गरिबांची भूक भागवत असून या योजनेला येथील डबेवाला विलास शिंदे याची साथ मिळाली आहे. गेल्या १४ डिसेंबर पासून रोज सायंकाळी ६ वाजता अंधेरी आणि वर्सोवा परिसरातील रस्त्यावर राहणाऱ्या गरिबांना १०० रोटी भाजीच्या डब्यांचे वाटप करण्यात येते.विशेष म्हणजे वर्सोवा,सातबंगला येथील सागरकुटीर मध्ये राहणारा डबेवाला विलास शिंदे हा सकाळी ९ ते सायंकाळी ४ पर्यंत लोखंडवाला ते वांद्रे पश्चिम पाली हिल पर्यंत २५ डब्यांचे वाटप करतो.तर  गेल्या १४ डिसेंबर पासून रोज सायंकाळी ६ वाजता अंधेरी आणि वर्सोवा परिसरातील रस्त्यावर राहणाऱ्या गरिबांना आपल्या दुचाकीवरून १०० रोटी भाजीच्या डब्यांचे वाटप करतो.या योजनेचे उद्घाटन चिल्ड्रन वेल्फेअर शाळेच्या पटांगणावर नुकत्याच  झालेल्या ३७व्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या दिमाखदार सोहळ्यात अभिनेत्री श्रीदेवीने केले.या शाळेचे प्राचार्य व एकता मंच या अशासकीय संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य अजय कौल यांनी ही माहिती दिली.
या कार्यक्रमाला अभिनेता जॅकी श्रॉफ, नील नितिन मुकेश, रवी किशन,सीआयडी फेम शिवाजी साटम, श्रेयस तळपदे आदी अनेकांनी आवर्जुन उपस्थित होते.तर इन्कम टँक्स कमिशनर राकेश भास्कर आई आर एस,मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम,वर्सोव्या पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरण कोळी,स्थानिक आमदार डॉ.भारती लव्हेकर,आमदार अमित साटम,वर्सोवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिसके पश्चिम प्रभाग समिती अध्यक्ष योगीराज दाभाडकर,माजी आमदार अशोकभाऊ जाधव,माजी स्थायी समिती अध्यक्ष यशोधर(शैलेश)फणसे,माजी विरोधी पक्ष नेते देवेंद्र(बाळा)आंबेरकर,स्थानिक नगरसेविका प्रतिमा खोपडे,नगरसेविका रंजना पाटील,शाळेचे अँक्टिव्हीटी चेअरमन प्रशांत काशीद उपस्थित होते.या मान्यवरांचा प्राचार्य अजय कौल यांनी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सुमारे ७००० विद्यार्थी व पालकांच्या उपस्थितीत जाहिर सत्कार केला.तर  कौल यांच्या शिक्षणक्षेत्रातील भरीव कामगिरीसह त्यांनी या मोफत रोटी भाजी योजनेचा देखिल या मान्यवरांनी आपल्या भाषणात खास गौरव केला.

माझी आई के.क्लारा कौल हिने मला प्रेरणा दिल्यामुळे १९८१ साली वेसावे कोळीवाड्यात एका छोट्याश्या खोलीत ७ विद्यार्थ्यांपासून मी शाळा सुरु केली होती.आज या शाळेचा वटवृक्ष झाला असून आज केजी ते पदवी पर्यंत येथे सुमारे ५००० विद्याथी शिक्षण घेतात.त्यामुळे माझ्या आईच्या जन्मदिनी १४ डिसेंबरला ही योजना चिल्ड्रन वेल्फेअर शाळेच्या माध्यमातून एकता मंच या अशासकीय संस्थेने ही योजना सुरु केल्याची माहिती त्यांनी दिली.

आम्ही येथील विद्यार्थ्यांना येथे दर्जेदार शिक्षण देण्याबरोबरच एक सामाजिक बांधिलकी यानात्याने समाजाचे दु:ख समजून शेअरिंग आणि केअरिंग या भावनेतून समाजासाठी चांगले काय करता येईल अशी नितीमूल्य त्यांच्यात वाढीस लागण्यासाठी आम्ही रोटी भाजी योजना सुरु केली आहे.तसेच त्यांच्यामध्ये सर्वधर्मसमभाव,बंधुता,देशप्रेम,आणि गरिबांची सेवा कशी करावी आदी संस्कार त्यांच्यात रुजवण्याचा सातत्यने प्रयत्न करत असतो असे प्राचार्य कौल यांनी अभिमानाने सांगितले.

सुमारे ६ तास चाललेल्या या वार्षिक स्नेह्संमेलनात यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी अनेक प्रकारचे नृत्य,गाणी,नाटक आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून त्यांनी उपस्थित बॉलीवूड अभिनेत्यांनी आणि राजकीय मंडळीची जोरदार दाद दिली.या वेळी येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
 

Web Title: Free Roti-bhaji food service to versovas children welfare students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.