वर्षाला ८०० रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया

By admin | Published: February 28, 2015 01:44 AM2015-02-28T01:44:42+5:302015-02-28T01:44:42+5:30

सुपरस्पेशालिटी उपचारांतर्गत वर्षापासून प्रलंबित असलेल्या मोफत शस्त्रक्रियेच्या प्रस्तावास सर्वसाधारण सभेने शुक्रवारी मंजुरी दिली

Free surgery on 800 patients per year | वर्षाला ८०० रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया

वर्षाला ८०० रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया

Next

नवी मुंबई : सुपरस्पेशालिटी उपचारांतर्गत वर्षापासून प्रलंबित असलेल्या मोफत शस्त्रक्रियेच्या प्रस्तावास सर्वसाधारण सभेने शुक्रवारी मंजुरी दिली. पुढील वर्षभरात कॅन्सर, हृदयविकार व इतर गंभीर आजार झालेल्या ८०० रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत.
नवी मुंबईकरांना सुपरस्पेशालिटी उपचार मोफत मिळावे यासाठी महापालिकेने वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयामधील १ लाख २० हजार चौरस फूट जागा अल्पदराने हिरानंदानी, फोर्टीज रुग्णालयास भाडेतत्त्वावर दिली आहे. या बदल्यात १० टक्के रुग्णांवर मोफत उपचार करण्याचा करार करण्यात आला होता. २०१० पासून महापालिकेने रुग्ण पाठविण्यास सुरुवात केली. परंतु उपचाराचा खर्च परवडत नसल्यामुळे सामान्य नागरिकांना या योजनेचा लाभ मिळाला नाही. आतापर्यंत ८६१८ रुग्णांना सुपरस्पेशालिटीचा लाभ घेतला.
सुपरस्पेशालिटीचा प्रयोग फसल्याची टीका झाल्याने पालिका, माजी पालकमंत्री गणेश नाईक, आमदार संदीप नाईक तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.
सर्वसाधारण सभेमध्ये प्रस्ताव मंजूर झाला. नगरसेवक साबू डॅनियल, सुरज पाटील, वैभव गायकवाड, सरोज पाटील, अनंत सुतार यांनी पूर्वीप्रमाणे त्रुटी राहणार नाहीत याची काळजी घेण्यात यावी, असे सुचविले. (प्रतिनिधी)

Web Title: Free surgery on 800 patients per year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.