मोफत उपचार मर्यादा अडीच लाखांवर
By admin | Published: November 23, 2014 01:38 AM2014-11-23T01:38:06+5:302014-11-23T01:38:06+5:30
दीड लाख रुपयांर्पयत मोफत उपचार मिळतात़ मात्र महागाईबरोबरच वैद्यकीय उपचारांचा खर्चही वाढत असल्याने ही मदत अत्यल्प ठरत आह़े
Next
मुंबई : गंभीर आजाराने त्रस्त गरजू रुग्णांना केंद्र शासनाच्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत दीड लाख रुपयांर्पयत मोफत उपचार मिळतात़ मात्र महागाईबरोबरच वैद्यकीय उपचारांचा खर्चही वाढत असल्याने ही मदत अत्यल्प ठरत आह़े त्यामुळे मोफत उपचाराची मर्यादा अडीच लाखांर्पयत वाढविण्याची मागणी ठरावाच्या सूचनेद्वारे पालिकेच्या महासभेपुढे करण्यात आली आह़े
गरजू रुग्णांना केंद्राच्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचार मिळत असतात़ मात्र या उपचाराच्या खर्चाची मर्यादा दीड लाख रुपये आह़े सध्या महागाईबरोबरच वैद्यकीय खर्चही वाढले आहेत़ त्यामुळे ही रक्कम गंभीर शस्त्रक्रियांसाठी अत्यल्प ठरत़े आरोग्य योजनेच्या सुविधांपासून बहुतांश रुग्ण त्यामुळे वंचित राहत असल्याचे निदर्शनास आले आह़े या योजनेचा फायदा मिळवून देण्यासाठी मोफत उपचाराच्या खर्चाची मर्यादा अडीच लाखांर्पयत वाढविण्याची मागणी नगरसेवक रामआशिष गुप्ता यांनी सभागृहापुढे ठेवली आह़े ही सूचना सभागृहात मंजूर होऊन आयुक्तांकडे अभिप्रायासाठी पाठविण्यात येणार आह़े (प्रतिनिधी)