गरीब विद्यार्थ्यांना मोफत ट्यूशन

By admin | Published: July 1, 2015 11:21 PM2015-07-01T23:21:07+5:302015-07-01T23:21:07+5:30

विक्रमगड येथील जिजाऊ सामजिक व शैक्षणिक संस्था, झडपोली संचलित मिशन अ‍ॅकडमी, बालाजी कॉम्पलेक्स, विक्रमगड येथे प्रथमच सामाजिक कार्यकर्ते निलेश सांबरे

Free tuition for poor students | गरीब विद्यार्थ्यांना मोफत ट्यूशन

गरीब विद्यार्थ्यांना मोफत ट्यूशन

Next

जव्हार : विक्रमगड येथील जिजाऊ सामजिक व शैक्षणिक संस्था, झडपोली संचलित मिशन अ‍ॅकडमी, बालाजी कॉम्पलेक्स, विक्रमगड येथे प्रथमच सामाजिक कार्यकर्ते निलेश सांबरे यांनी गरीब गरजू इ. ५ वी ते १० वी विद्यार्थ्यांनाकरीता मोफत ट्यूशनचे आयोजन करून मिशन अ‍ॅकडमीचे उदघाटन बुधवारी माजी जि. प. अध्यक्ष काशीनाथ पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी विक्रमगडचे सरपंच भडांगे, हबीब शेख, निलेश पडवळे, रूपेश जगे, मनोज आळशी शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या सख्येत उपस्थित होते.
आजच्या युगात ग्रामीण आदिवासी भागातील विद्यार्थी मोठ्या उत्साहाने शिक्षण घेतात, परंतु त्यांना शालाबाह्य प्रशिक्षणाची मोठी गरज असते. आदिवासी विद्यार्थ्यांकडे पुरेसे पैसे नसल्यामुळे हजारो रूपये फी असलेल्या ट्युशन्सचे बाह्य शिक्षण घेणे शक्य होत नव्हते, त्यामुळे ग्रामीण भागातील मुले-मुली नियमित शिक्षणाबरोबर ट्युशन न लावल्यामुळे, निकालाची टक्केवारी घसरत होती.
परंतू विक्रमगड तालुक्यातील निलेश सांबरे यांनी मोफत कोचिंग कलासेस सुरू केल्यामुळे पहिल्याच दिवशी इ. ५ वी ते १० वीच्या एकुण २८० गरजू विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला, या कोचिंग क्लासेसमुळे विद्यार्थ्यांच्या निकालात मोठी वाढ होणार आहे.
मुख्य रस्त्यावरील दोन मोठ्या हॉलमध्ये शहरातील बडया फी घेणाऱ्या कोचिंग क्लासेस प्रमाणे अत्यंत उत्कृष्ट सजावटीसह, हॉल तयार करून फळा, बेंच या गोष्टींची पुरेपूर व्यवस्था करण्यात आलेली आहे, तसेच उच्च शिक्षीत ४ शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. एवढा मोठा खर्च करण्याचे धाडस त्यांनी केल्यामुळे सर्व स्तरातून व पालक वर्गातून त्यांचे कौतुक करण्यात आलेले आहे. (वार्ताहर)

Web Title: Free tuition for poor students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.