कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंधेरीच्या २००० झोपडपट्टीधारकांचे मोफत लसीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2021 08:01 PM2021-06-27T20:01:55+5:302021-06-27T20:02:28+5:30
Coronavirus Vaccine : सध्या देशात मोठ्या प्रमाणात लसीकरणाची मोहीम घेण्यात आली आहे हाती.
मुंबई-एकीकडे डेल्टा प्लस या नवीन व्हायरसचा धोका आणि येणारी तिसरी लाट लक्षात घेता लसीकरणावर भर देण्यात येत आहे. अंधेरी पश्चिम विधानसभा मतदार संघातील भाजप आमदार अमित साटम यांनी पालिकेचा भार हलका करत गेल्या दोन दिवसात २००० झोपडपट्टी धारकांचे मोफत लसीकरण केले. तर आतापर्यंत येथील विविध गृहनिर्माण सोसायटीतील १५००० नागरिकांचे मोफत लसीकरण केल्याची माहिती त्यांनी लोकमतला दिली. या मतदार संघातील वयोगट १८ पुढील झोपडपट्टीधारकांचे मोफत लसीकरणदेखील लवकर करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
जुहू येथील विद्यानिधी शाळेत येथे दोन दिवसांत विनामूल्य खासगी लसीकरण शिबिर आयोजित केले होते. यामध्ये अंधेरी पश्चिमेतील विविध झोपडपट्ट्यांमधील २००० हून अधिक नागरिकांना मोफत लस देण्यात आली.
जेजेसी जुहू बीच आणि जेआयओ (जुहू -सांताक्रूझ) यांनी लस प्रायोजित केली होती अशी माहिती त्यांनी दिली. याव्यतिरिक्त अंधेरीत भाजपा नगरसेवकांमार्फत ठिकठिकाणी लसीकरण शिबिरांचे आयोजन करण्यात येत असून यामधूनदेखील नागरिकांचे लसीकरण सुरू असल्याचे आमदार अमित साटम म्हणाले.