वीस हजार हॉटेल कर्मचाऱ्यांचे मोफत लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:10 AM2021-08-21T04:10:23+5:302021-08-21T04:10:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मिशन बिगीन अगेन अंतर्गत राज्यातील हॉटेल आणि रेस्टॉरंट रात्री १० वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेसह ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मिशन बिगीन अगेन अंतर्गत राज्यातील हॉटेल आणि रेस्टॉरंट रात्री १० वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेसह सुरू झाली आहेत. हॉटेल संघटनांनी कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी पुढाकार घेतला आहे. आहार आणि एसआरसीसी चिल्ड्रेनस हॉस्पिटलच्या पुढाकारामुळे कांदिवली येथे शुक्रवारी वीस हजार हॉटेल कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख उपस्थित होते. आहारकडून मुंबईत १७ ऑगस्ट रोजी विविध ठिकाणी लसीकरण मोहीम राबविण्यात आली. यामध्ये ४०० जणांचे लसीकरण करण्यात आले होते.
आहारचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी म्हणाले की, एसआरसीसी रुग्णालयाच्या सहकार्यामुळे ही लसीकरण मोहीम करणे शक्य झाले आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले आहे, ते लवकरात लवकर कामावर परतणार आहेत. लॉकडाऊनमुळे कित्येक हॉटेल कर्मचाऱ्यांचा रोजगार हिरावला गेला. त्यांना काही महिन्यांपासून उत्पन्नाचे कोणतेही साधन नव्हते. त्यांना सुरक्षितरीत्या आपल्या कामावर रुजू होता येणार आहे. ही मोहीम यशस्वी केल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो.