लस मोफत देणे केंद्राच्या निर्णयावर अवलंबून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:07 AM2021-01-17T04:07:06+5:302021-01-17T04:07:06+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क मुंबई : केंद्र सरकारच्या निर्देशानुसार प्रथम कोरोना योद्ध्यांना मोफत लस देण्यात येत आहे. अन्यथा मी देखील ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : केंद्र सरकारच्या निर्देशानुसार प्रथम कोरोना योद्ध्यांना मोफत लस देण्यात येत आहे. अन्यथा मी देखील लस घेतली असती. केंद्र सरकार मोफत लसीबाबत काय निर्णय घेणार, हे समोर आले की, राज्य सरकार आपला निर्णय घेईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
* लस वाटपावरुन राजकारण नको
महाराष्ट्र राज्याच्या तुलनेत पश्चिम बंगालला कोरोना लसीचा अधिक साठा देण्यात आला आहे. याबाबत पत्रकारांनी विचारले असता, मुख्यमंत्री या नात्याने राज्याचे सर्व नागरिक मला सारखेच आहेत. तसेच, देशातील सर्व नागरिक हे पंतप्रधानांना सारखेच आहेत अथवा असावेत. त्यामुळे कोरोना लस कोणाला कमी, कोणाला जास्त दिली, याबाबत राजकारण नको, असा अप्रत्यक्ष टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.
* लवकरच लसींचा साठा वाढेल
आणखी दोन - तीन कंपन्या लसीची चाचणी करत आहेत. त्यामुळे लवकरच लसींचा साठा वाढेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.