ऑनलाइन वीजबिल भरणाऱ्यांना फ्रीज, वॉशिंग मशीन बक्षीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:07 AM2021-09-19T04:07:16+5:302021-09-19T04:07:16+5:30
मुंबई : ऑनलाइन वीज देयके भरणाऱ्या ग्राहकांसाठी बेस्ट उपक्रमाने बक्षीस घोषित केले होते. अशा लकी ग्राहकांची नावे लॉटरी पद्धतीद्वारे ...
मुंबई : ऑनलाइन वीज देयके भरणाऱ्या ग्राहकांसाठी बेस्ट उपक्रमाने बक्षीस घोषित केले होते. अशा लकी ग्राहकांची नावे लॉटरी पद्धतीद्वारे शुक्रवारी जाहीर केली. यामध्ये विजेते ठरलेल्या ग्राहकांना फ्रीज, वॉशिंग मशीन, मोबाइल फोन, मिक्सर बक्षीस स्वरूपात मिळाले आहे.
बेस्ट उपक्रमामार्फत कुलाबा, कफ परेड ते सायन आणि चर्चगेट ते माहीम या परिसरात वीजपुरवठा केला जातो. बेस्ट उपक्रमाची वीज वापरणारे तब्बल दहा लाख ५० हजार ग्राहक आहेत. यापैकी सहा लाख ग्राहक ऑनलाइन वीजबिल भरतात. ऑनलाइन वीज देयके वेळेत भरली जातात. ग्राहकांना प्रोत्साहित करण्यासाठी बेस्ट उपक्रमाने बक्षीस योजना आणली आहे.
मागील दोन महिन्यांत ऑनलाइन वीज देयके भरणाऱ्या ग्राहकांची संख्या ३१ हजारांनी वाढली आहे. अशा ग्राहकांसाठी जाहीर केलेल्या बक्षिसाचा लकी ड्रॉ शुक्रवारी काढण्यात आला. संगणकीय प्रणालीद्वारे नऊ विजेत्यांची नाव जाहीर करण्यात आली आहेत. त्यांना फ्रीज, मोबाइल, वॉशिंग मशीन, मिक्सर, फूड प्रोसेसर अशा वस्तू देण्यात आल्याने ग्राहकही आनंदी झाले आहेत.