फ्रेट कॉरिडोरचा जेएनपीटीला घोर, महाराष्ट्रातील काम संथ गतीने सुरू असल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 05:54 AM2020-03-03T05:54:54+5:302020-03-03T05:54:58+5:30

पश्चिम किनारपट्टीवरील प्रमुख बंदरातून देशाच्या उत्तरेकडे होणाऱ्या मालवाहतुकीसाठी उभारल्या जाणा-या महत्त्वाकांक्षी मुंबई दिल्ली फ्रेट कॉरिडोरचे महाराष्ट्रातील काम संथ गतीने सुरू

Freight corridor accuses JNPT of slow, slow progress in Maharashtra | फ्रेट कॉरिडोरचा जेएनपीटीला घोर, महाराष्ट्रातील काम संथ गतीने सुरू असल्याचा आरोप

फ्रेट कॉरिडोरचा जेएनपीटीला घोर, महाराष्ट्रातील काम संथ गतीने सुरू असल्याचा आरोप

Next

संदीप शिंदे 
मुंबई : पश्चिम किनारपट्टीवरील प्रमुख बंदरातून देशाच्या उत्तरेकडे होणाऱ्या मालवाहतुकीसाठी उभारल्या जाणा-या महत्त्वाकांक्षी मुंबई दिल्ली फ्रेट कॉरिडोरचे महाराष्ट्रातील काम संथ गतीने सुरू असून, गुजरातपर्यंतचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. त्यामुळे कच्छ येथील अदानी उद्योग समूहाची मुंद्रा बंदराची भरभराट होणार असून, जेएनपीटीला त्याचा मोठा फटका बसेल, अशी भीती जेएनपीटीच्याच अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. दिल्लीतील दादरी ते महाराष्ट्रातील जेएनपीटीपर्यंतच्या या सुमारे १,५०० किमी मार्गिकेचे काम प्रगतिपथावर आहे. १४ औद्योगिक वसाहती, दोन आंतरराष्ट्रीय विमानतळे, जेएनपीटी, कांडला, मुंद्रा, पिपाव ही प्रमुख बंदरे आदी त्यामुळे जोडली जातील. कंटेनरद्वारे होणाºया मालवाहतुकीसाठी ही विशेष मार्गिका तयार केली जात आहे. त्यामुळे मालवाहतूक करणाºया रेल्वे गाड्यांचा वेग २५ वरून ७० किमी प्रती तास होईल. वहनक्षमता दुपटीने वाढेल. त्यामुळे मालवाहतुकीच्या खर्चात मोठी बचत होऊन बंदरातील अर्थव्यवस्थेसाठी ही मार्गिका गेम चेंजर ठरणारी आहे. त्यामुळेच पहिल्या टप्प्यात ही मार्गिका अदानीच्या मुंद्रा बंदराला जोडली जाणार असल्याने जेएनपीटीच्या अधिकाºयांना घोर लागला आहे.
मुंद्रा बंदरातून या कॉरिडोरची सेवा सुरू झाल्यानंतर राजस्थान, उत्तर प्रदेश, हरयाणा, दिल्ली या राज्यांत मालवाहतूक करणारी जहाजे या खासगी बंदराला प्राधान्य देतील. त्यामुळे त्यांच्या परिसरातील उद्योगधंदे, व्यवसायांना चालना मिळेल. त्याचे विपरित परिणाम जेएनपीटीतील आयात-निर्यात, संलग्न व्यवसाय आणि प्रस्तावित एसईझेडच्या विकासावर होतील. जेएनपीटीसह महाराष्ट्राच्या आर्थिक विकासालाही त्याच्या झळा
सोसाव्या लागतील, अशी भीती
काही अधिकाºयांनी व्यक्त केली.
>कॉरिडोर हा जेएनपीटीचे हित लक्षात घेऊन तयार केला आहे. मात्र, कामाच्या प्रगतीनुसार तो मुंद्रा बंदराला सर्वात आधी जोडला जाईल. त्यामुळे साहजिकच त्या बंदरातील आयात-निर्यात वाढेल. त्याचे परिणाम जेएनपीटीला सोसावे लागतील. त्यामुळे एकंदर प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करीत आहोत.
- संजय सेठी, अध्यक्ष जेएनपीटी

>मार्गिकेचे काम नियोजित वेळेनुसार होत आहे. पहिल्या टप्प्यातील काम मार्च, २०२० मध्ये पूर्ण होईल. महाराष्ट्रातील कामही डिसेंबर, २०२१ पर्यंत पूर्ण
करण्याचे नियोजन आहे. राज्यातील घोलवड ते जेएनपीटीपर्यंतच्या सुमारे १६७ किमी मार्गिकेसाठी भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली असून, काम वेगाने सुरू आहे.
- राजीव त्यागी, प्रोजेक्ट डायरेक्टर (डीएफसीसीआयएल)

Web Title: Freight corridor accuses JNPT of slow, slow progress in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.