रेल्वेच्या सामुग्री व्यवस्थापन विभागामुळे मालगाड्या सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 08:30 PM2020-05-07T20:30:57+5:302020-05-07T20:31:09+5:30
लॉकडाऊन काळात देशातील कानाकोपऱ्यात जीवनावश्यक सामग्रीचा पुरवठा मालगाडी, पार्सल गाडी यांच्याद्वारे केला जात आहे.
मुबई : लॉकडाऊन काळात देशातील कानाकोपऱ्यात जीवनावश्यक सामग्रीचा पुरवठा मालगाडी, पार्सल गाडी यांच्याद्वारे केला जात आहे. मात्र हि सेवा सुरळीत सुरु राहण्यासाठी मध्य रेल्वेचा सामुग्री व्यवस्थापन विभाग चोवीस तास काम करत आहे. मध्य रेल्वेच्या सर्व विभागांना खरेदीद्वारे साहित्य वेळेवर उपलब्ध करून देत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील प्रवासी रेल्वे वाहतूक बंद आहे. याकाळात जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा सुरु राहावा, यासाठी भारतीय रेल्वेच्या पार्सल आणि मालगाड्या धावत आहे. मात्र या मालगाड्या चालविण्यासाठी रेल्वेला लाखो छोट्या मोठ्या वस्तूची गरज असते. त्यांच्या खरेदी करून पुरवठा करण्याची जबाबदारी रेल्वेच्या सामुग्री व्यवस्थापन विभागाकडे असते. त्यामुळे सामुग्री व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी अहोरात्र काम करून साहित्य खरेदी करत वेळेवर रेल्वेला पोहचविण्याचे काम करत आहे. त्यामुळे या मालगाड्या, पार्सल रेल्वे मार्गांवर सुरळीत धावत आहेत.
सामुग्री व्यवस्थापन अधिका-यांनी निविदा तयार केल्या आहे. रेल्वे रूग्णालय, इतर कर्मचार्यांसाठी अल्पावधीत तातडीने अत्यावश्यक वस्तू आणि उपकरणे खरेदी करण्याचे काम सुरु आहे. कोरोनाच्या तातडीच्या अत्यावश्यक वस्तूंमध्ये पीपीई किट्स, एन-९५ मास्क, ग्लोव्हज, सॅनिटायझर्स यासारख्या जीवनरक्षक वैद्यकीय उपकरणे समाविष्ट आहे. विविध विभागीय कार्यालयांमधील सामुग्री व्यवस्थापन टीम देखील केंद्रीकृत तातडीची अत्यावश्यक खरेदी करण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करीत आहेत आणि विविध ठिकाणी प्रत्यक्ष वाहतुकीची आणि वितरणाची व्यवस्था केली जात आहे. लॉकडाऊमुळे मध्य रेल्वेच्या सामुग्री व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी कर्तव्यांवर येता येत नाही. त्यामुळे घरी बसूनच कॉम्प्युटर आणि लॅपटॉपवर काम करत आहे, साहित्याच्या प्रत्यक्ष वितरणा व्यतिरिक्त, विभागाने ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा (आयएमआयएमआयएस, आयआरईपीएस आणि इतर) व्यापक वापर केला जात आहे.मध्य रेल्वे या विभागाचे सर्वच कर्मचारी रेल्वेला सामुग्री पुरवठा करण्यासाठी अहोरात्र मेहनत करत आहे.
देशभरात जीवनावश्यक सामग्रीची वाहतूक करणार्या मालगाडी आणि पार्सल गाडी सुरु आहे. मात्र या गाड्या चालवलेल्या विद्युत आणि डिझेल लोको होल्डिंगचे कामकाज आणि देखभाल करण्यासाठी आवश्यक असणारी सर्व आवश्यक वस्तू व उपकरणाचा उपलब्धता सामुग्री व्यवस्थापन डेपो सुनिश्चित करीत आहेत. रेल्वेचे डबे आणि इंजिन देखभालीसाठी लागणाऱ्या साहित्याचा तुडवडा पडू नयेत, यासाठी हा विभाग दक्षता घेत आहे. कोरोनाचा रूग्णांच्या वापरासाठी रेल्वे कोचमध्ये बदल करण्याचे पुरवण्या व्यतिरिक्त कोरोना साठी कव्हरऑल सारख्या आवश्यक वस्तू तयार करणा-या कारखान्यांना कच्च्या मालासारख्या वस्तूदेखील पुरविल्या गेल्या आहे.