ऑगस्टपासून प्रत्येकाचे मतदार कार्ड आधारशी लिंक करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 08:58 AM2022-07-26T08:58:30+5:302022-07-26T08:58:59+5:30

मतदार याद्यांचे प्रमाणीकरण, दुबार नावे वगळणे यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदारकार्ड आधारशी संलग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

From August everyone's voter card will be linked with Aadhaar | ऑगस्टपासून प्रत्येकाचे मतदार कार्ड आधारशी लिंक करणार

ऑगस्टपासून प्रत्येकाचे मतदार कार्ड आधारशी लिंक करणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मतदार ओळखपत्र आधार कार्डशी जोडण्याची मोहीम १ ऑगस्टपासून राज्यात सुरू  होणार आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी पत्र परिषदेत ही माहिती दिली. आधारशी मतदारकार्ड संलग्न करण्याची सक्ती नसली तरी इतर पासपोर्ट आदी ११ पर्यायी कागदपत्रे द्यावीच लागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मतदार याद्यांचे प्रमाणीकरण, दुबार नावे वगळणे यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदारकार्ड आधारशी संलग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी देखील याबाबत चर्चा करण्यात येणार असल्याचेही देशपांडे यांनी सांगितले.

याचे दोन फायदे
मतदार कार्ड आधारशी संलग्न केल्यामुळे मतदाराच्या ओळखीचे प्रमाणीकरण, एकापेक्षा अधिक नोंदीची वगळणी तर शक्य होणार आहेच. 
निवडणूक तसेच मतदानासंबंधी माहिती व आयोगाकडून प्रसारित होणाऱ्या सूचना मतदाराला त्याच्या फोनपर्यंत थेट पाठविता येणार आहेत.

अनिवार्य आहे का?
आधार क्रमांक संलग्न करणे ऐच्छिक आहे. त्यामुळे मतदाराकडे आधार क्रमांक नसल्यास नमुना ६ ब मध्ये नमूद केल्याप्रमाणे त्यांना मनरेगा जॉब कार्ड, फोटोसहित किसान पासबुक, आरोग्य स्मार्ट कार्ड, वाहन परवाना, पॅनकार्ड, एनपीआर अंतर्गत आरजीआय द्वारा दिले गेलेले स्मार्ट कार्ड, पासपोर्ट, फोटोसहित पेन्शन कागदपत्रे, केंद्र / राज्य शासन कर्मचाऱ्याचे ओळखपत्र, आमदार / खासदार यांना दिलेले ओळखपत्र, सामाजिक न्याय विभागाकडील ओळखपत्र या ११ पयार्यापैंकी कोणताही एक दस्तावेज सादर करता येईल. आधारक्रमांकाची गोपनीयता अबाधित ठेवण्यात येईल.

मतदारांना काय करावे लागेल?
n आधारशी मतदारकार्ड जोडण्यासाठी अर्ज क्रमांक ६ ब भरावा लागणार आहे. 
n भारत निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ, राज्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळ, नॅशनल व्होटर सर्व्हिस पोर्टल, व्होटर हेल्पलाईन ॲप या ठिकाणी फॉर्म ऑनलाईनही भरता येईल. 
n तसे करणे शक्य न झाल्यास आधारकार्डाची साक्षांकित प्रतही मतदाराला प्रत्यक्ष सादर
करता येईल.
n घरोघरी जाऊनदेखील हा फॉर्म भरून घेण्यात येईल.
n निवडणूक कार्यालयांकडून त्यासाठी
राज्यव्यापी विशेष शिबिरेदेखील आयोजित करण्यात येणार आहेत.

 

Web Title: From August everyone's voter card will be linked with Aadhaar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.