Join us  

बिबट्यापासून स्थानिकांच्या संरक्षणासाठी तातडीने उपाययोजना करा; आमदार सुनिल प्रभू यांची मागणी

By मनोहर कुंभेजकर | Published: June 09, 2024 10:52 PM

यासदर्भात दिंडोशी विधानसभा क्षेत्राचे आमदार सुनिल प्रभू यांनी मुख्य वनसंरक्षक, ठाणे यांना पत्र लिहून नागरिकांच्या संरक्षणासाठी तसेच बिबट्याचा वावर रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी केली आहे.

मुंबई: दिंडोशी विधानसभा मतदारसंघात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगत न्यू दिंडोशी येथे ७७  गृहनिर्माण संस्था असून तिथे बिबट्याचा मुक्त संचार आहे.मालाड (पू) दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगत संरक्षक भिंत नसल्याने स्थानिकांना बिबट्याच्या दहशतीखाली रहावे लागते. 

यासदर्भात दिंडोशी विधानसभा क्षेत्राचे आमदार सुनिल प्रभू यांनी मुख्य वनसंरक्षक, ठाणे यांना पत्र लिहून नागरिकांच्या संरक्षणासाठी तसेच बिबट्याचा वावर रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी केली आहे.लोकमतने देखिल सातत्याने या विषयी आवाज उठवला आहे.

याबाबत आ. सुनिल प्रभू यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान वनविभाग अधिका-यांशी चर्चा केली. चर्चेअंती पिंजरा लावावा अशी सूचना त्यांनी विविध शासकीय अधिकाऱ्यांना केली होती. मात्र शासनाच्या वन विभागाची विशेष परवानगी घेण्याकरता संजय गांधी वन विभाग अधिकारी कार्यालय बोरिवलीपासून वन अधिकारी नागपूर कार्यालयापर्यंत विविध परवानग्यांसाठी प्रस्ताव पाठवून कारवाई करावी लागत आहे. परवानग्यांतील जाचक अटींमुळे उपाययोजना करण्यात अनेक अडचणी येतात. जाचक अटींमुळे पाठपुरावा करून सुद्धा परवानगी मिळत नाही. 

दिंडोशी विधानसभा मतदारसंघात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगत न्यू दिंडोशी येथे ७७  गृहनिर्माण संस्था असून तिथे बिबट्याचा मुक्त संचार आहे. स्थानिक जीव मुठीत घेऊन जगत आहेत. पिंजरा लावण्यात नागपूर वनविभागास असलेले अधिकार संजय गांधी राष्ट्रीय उद्यानास द्यावेत, संरक्षक भिंतीचे काम युध्दपातळीवर पूर्ण करावे, शीघ्रगती प्रतिसाद पथक स्थापन करावे, अभ्यास गट समितीची स्थापना करावी, समितीच्या शिफारशीनुसार तातडीने कारवाई करावी अशा मागण्या आ. सुनिल प्रभू यांनी मुख्य वनसंरक्षक, ठाणे यांना पत्राद्वारे केल्या आहेत.