Join us

मुंबईहून समुद्रमार्गेच जा आता थेट पालघर; वर्सोवा-विरार सागरी सेतू मार्गासाठी सल्लागार नेमणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2023 7:19 AM

हा टप्पा प्रत्यक्षात पूर्ण झाल्यास नरिमन पॉइंट ते वरळीहून थेट पालघरपर्यंत विनाअडथळा समुद्रमार्गे प्रवास करता येणार आहे. 

- नारायण जाधव

नवी मुंबई : वर्सोवा-विरार सागरी सेतूचा थेट पालघरपर्यंत विस्तार करण्याच्या हालचाली आता ‘एमएमआरडीए’ने सुरू केल्या आहेत. यापूर्वी वरळी ते वांद्रेनंतर वांद्रे ते वर्सोवा आणि वर्सोवा ते विरार असा टप्प्याटप्प्याने विस्तार करण्याचा निर्णय ‘एमएमआरडीए’ने घेतला हाेता. तसेच याच मार्गाचा पुढे पालघरपर्यंत विस्तार करण्याची घोषणा केली हाेती. ही घोषणा आता प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी आता विस्तारित विरार ते पालघरपर्यंतचा सी-लिंकचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासह वर्सोवा ते विरार मार्गाच्या सविस्तर प्रकल्प अहवालाचे पुनरावलोकन करण्यासाठी सल्लागार नेमण्यासाठी मंगळवारी निविदा मागविल्या.

हा टप्पा प्रत्यक्षात पूर्ण झाल्यास नरिमन पॉइंट ते वरळीहून थेट पालघरपर्यंत विनाअडथळा समुद्रमार्गे प्रवास करता येणार आहे. वांद्रे ते वर्सोवापर्यंतच्या १७ किमीच्या सी-लिंकचे काम प्रगतिपथावर आहे; तसेच वर्सोवा ते विरार मार्गासाठी थेट जपानच्या जायका संस्थेने कर्ज देण्यास मान्यता दिली आहे. ही मार्गिका एकूण ४२.७५ किमी आहे. तिचा खर्च ३१,४२६ कोटींवरून थेट ६३,४२४ कोटींवर गेला आहे. हाच मार्ग आता पुढे पालघरपर्यंत वाढविण्यात येणार आहे. सध्या रस्ता मार्गे विरार ते पालघर ५४.६ किमी अंतर आहे.

मढ आयर्लंडसह गोराई बीचला लाभप्रस्तावित वर्साेवा-विरार सी-लिंक हा मढ आयलंड, गोराई बीच, आगाशी रोड येथे कनेक्ट करण्यात येणार असून, मनोरी येथील खाडीपूल याचाच भाग असणार आहे.

टॅग्स :मुंबई