Join us

८ नोव्हेंबरपासून ‘पु.ल. कलामहोत्सव’, सर्वांसाठी विनामूल्य

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2023 8:01 AM

८ नोव्हेंबरला सायंकाळी ७ वाजता अकादमीच्या कलांगणात सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.  

मुंबई : महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु.ल. देशपांडे यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य विभाग, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबईच्या वतीने ८ ते १४ नोव्हेंबरदरम्यान ‘पु. ल. कलामहोत्सव २०२३’चे आयोजन करण्यात आले आहे. ८ नोव्हेंबरला सायंकाळी ७ वाजता अकादमीच्या कलांगणात सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.  

हा महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य आहे. साहित्य, गायन, वादन, नृत्य, नाट्य अशा विविध कला प्रकारांवर आधारलेला पु.ल. कलामहोत्सव कार्यक्रमांची पर्वणी ठरेल. उद्घाटनानंतर कलांगणात कोल्हापुरातील काफीला संस्थेचा ‘जियारत’ हा कार्यक्रम होईल. ९ नोव्हेंबरला पं. डॉ. राम देशपांडे यांचा ‘शतदीप उजळले’ हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम होईल. 

दीपावली पहाट १४ नोव्हेंबरला शैलेश भागवत आणि विदूषी आरती अंकलीकर-टिकेकर ‘अभ्यंग संगीत साधना महोत्सव - दीपावली पहाट’ सादर करतील.

टॅग्स :पु. ल. देशपांडे