CAA & NRC : सीएए, एनआरसीच्या विरोधात मुंबईतील आझाद मैदानात मोर्चा; 65 संघटनांचा सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2020 03:57 PM2020-02-15T15:57:07+5:302020-02-15T19:20:06+5:30
CAA & NRC : सीएए आणि एनआरसीच्या विरोधात मुंबईतील आझाद मैदानात आज मोर्चा काढण्यात आला आहे.
मुंबई: नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायदा (एनआरसी)च्या विरोधात मुंबईतील आझाद मैदानात आज मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चामध्ये एकूण 65 संघटनांनी सहभाग नोंदविला आहे.
दोन ठग लोकांना छळत असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर केला आहे. अबू आझमी देखील सीएए आणि एनआरसीच्या विराधातील मोर्च्यात सहभागी झाले आहे.
अभिनेता सुशांत सिंह यांनी देखील आझाद मैदानावर सीएए आणि एनआरसीच्या विरोधात सुरु असणाऱ्या मोर्च्यात सहभाग घेतला.
Maharashtra: Actor Sushant Singh participates in a protest rally against Citizenship Amendment Act and National Register of Citizens at Azad Maidan in Mumbai. pic.twitter.com/H7G9VvRBLK
— ANI (@ANI) February 15, 2020
संविधान वाचले तरच देश वाचेल असं आंदोलकांचे म्हणणे आहे. तसेच देशभरात सीएए आणि एनआरसीबाबत जे आंदोलन सुरु आहे. त्या आंदोलनाला आमचा पाठिंबा असून केंद्र सरकारच्या हुकूमशाहीला विरोध आहे म्हणून आम्ही मोर्च्यामध्ये सहभागी झाल्याचे आंदोलकांनी सांगितले आहे.