पनवेल : स्थानिक शेतक:यांना विश्वासात न घेता सिडको नैना प्रकल्प राबवित आहे. या प्रकल्पांतर्गत 270 गावातील शेतक:यांवर आपल्या जमिनी गमावण्याची वेळ येऊ शकते. भूमिपुत्रंना या प्रकल्पाची कुठलीही कल्पना न देता विकासाच्या गमजा मारणा:यांना शेतक:यांची एकजूट दाखवण्यासाठी व शेतक:यांना विश्वासात घेतल्याशिवाय हा प्रकल्प राबवू देणार नाही या मागणीसाठी या इशारा मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
या मोर्चाचे नेतृत्व आमदार विवेक पाटील व पनवेल विधानसभा मतदार संघाचे उमेदवार बाळाराम पाटील यांनी केले. नवीन पनवेल येथील शिवा कॉम्प्लेक्स येथून या मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चाच्या सुरुवातीलाच पनवेल विधानसभा मतदार संघाचे उमेदवार यांनी या मोर्चामागची पाश्र्वभूमी समजावून सांगितली व शांततेत मोर्चा पार पडण्याचे आवाहन केले.
सिडको कार्यालयात वरिष्ठ अभियंता तांबडे यांना निवेदन देण्यासाठी बाळाराम पाटील व नैना प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष वामन शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळ कार्यालयात गेले. त्यावेळी नैना प्रकल्पाचे मुख्य नियोजन अधिकारी वेणुगोपाल यांना पाचारण करण्यात आले. बाळाराम पाटील यांनी नैना प्रकल्पाअंतर्गत शेतक:यांना विश्वासात न घेतल्याच्या भूमिकेचा निषेध केला. आर. डी. घरत, रमेश पाटील यांना शेतक:यांच्या उद्विगA भावना सिडको अधिका:यांसमोर मांडल्या व आम्ही कायम संघर्षच करायचा काय? असा खडा सवाल अधिका:यांना विचारला.
त्याचबरोबर आम्हाला गृहीत धरुन हा प्रकल्प सुरु होणार नाही, असा इशारा देखील दिला. त्यावर तांबडे व वेणुगोपाल यांनी लवकरच संघर्ष समिती, आमदार विवेक पाटील, बाळाराम पाटील यांची सिडको अधिका:यांसोबत नैना प्रकल्पाकरिता बैठक आयोजित करु, असे आश्वासन दिले व नैना प्रकल्पात शेकाप व शेतकरी यांना विश्वासात घेऊनच प्रकल्प राबवू असा विश्वास दर्शविला.
या मोर्चात आमदार विवेक पाटील, पनवेल विधानसभा मतदार संघाचे उमेदवार बाळाराम पाटील, पनवेल विधानसभा अध्यक्ष काशिनाथ पाटील, नैना प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष वामन शेळके, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, पनवेल नगर पालिकेचे विरोधी पक्षनेते संदीप पाटील, नगरसेवक गणोश कडू, ज्येष्ठ नेते आर. डी. घरत, बाळाराम पाटील, सोशल फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष प्रकाश म्हात्रे, पंचायत समितीचे सभापती गोपाळ भगत, माजी सभापती हरेश केणी, वांगणीतर्फे वाजेविभागाचे अध्यक्ष रमेश पाटील, पंचायत समिती सदस्य विद्या पाटील, उत्तर भारतीय महिला आघाडीच्या अध्यक्षा अमिता चौहान, तालुका सहचिटणीस शंकर म्हात्रे, कार्यालयीन चिटणीस जितेंद्र म्हात्रे आदी मान्यवर सहभागी झाले होते. (वार्ताहर)