पाण्यासाठी गोवंडीवासीयांचा मोर्चा
By admin | Published: November 11, 2014 01:00 AM2014-11-11T01:00:12+5:302014-11-11T01:00:12+5:30
शहरातील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी कोटय़वधींचा निधी खर्च करणारी मुंबई महापालिका गोवंडीकडे मात्र गेल्या 2क् वर्षापासून दुर्लक्ष करीत आहे.
Next
गोवंडी : शहरातील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी कोटय़वधींचा निधी खर्च करणारी मुंबई महापालिका गोवंडीकडे मात्र गेल्या 2क् वर्षापासून दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे संतापलेल्या रहिवाशांनी आज एम पूर्व कार्यालयावर धडक मोर्चा काढून जोरदार निदर्शने केली.
पूर्व उपनगरांतील सर्वात मोठी झोपडपट्टी गोवंडी, शिवाजीनगर आणि मानखुर्द परिसरात आहे. मतदानावेळी या भागातून चांगल्या प्रकारे मतदान होत असल्याने निवडणुकीपूर्वी अनेक राजकीय नेते येथील रहिवाशांना येथील पाणीप्रश्न सोडवण्याचे आश्वासन देतात. मात्र निवडून आल्यानंतर नगरसेवक असो वा आमदार किंवा खासदार या परिसरात फिरकतदेखील नाहीत. त्यामुळेच गेल्या 2क् वर्षापासून येथील पाणीप्रश्न जैसे थे आहे. मात्र गेल्या तीन-चार वर्षात परिसरातील रहिवाशांसह काही राजकीय पक्षांच्या कार्यकत्र्यानी अनेक आंदोलने छेडली. त्यानुसार पालिकेने दोन वर्षापूर्वी या ठिकाणी नव्याने पाइपलाइन टाकून पाणीप्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र अद्यापही या पाइपलाइनमधून पाणी येण्यास मुहूर्त सापडलेला नाही. त्यामुळे रहिवाशांना सध्या पाणी विकत घेऊनच घर चालवावे लागत आहे.
परिसरातील वाढती लोकसंख्या पाहता या परिसरात 21 एमएलडी एवढी पाण्याची गरज आहे. मात्र पालिकेकडून केवळ 9 एमएलडी एवढाच पाणीपुरवठा केला जात असल्याने पाणीटंचाई निर्माण होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ता इरफान दिवटे यांनी केला आहे. गेली अनेक वर्षे येथील रहिवाशांना पाण्याची समस्या भेडसावत असतानाच गेल्या 1क् ते 12 दिवसांपासून पालिकेकडून काहीच पाणी येत नसल्याने संतापलेल्या रहिवाशांनी आज अखेर पालिकेच्या एम पूर्व कार्यालयावर धडक मोर्चा काढला. (प्रतिनिधी)
च्इरफान दिवटे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये परिसरातील दीड ते दोन हजार लोकांनी सहभाग घेतला होता. या वेळी पालिका अधिका:यांनी लवकरच ही बाब पालिका आयुक्तांच्या समोर मांडणार असल्याचे लेखी आश्वासन आंदोलकत्र्याना दिले आहे. मात्र पालिकेने 48 तासांत यावर निर्णय न घेतल्यास उपोषणाला बसण्याचा इशारादेखील दिवटे यांनी दिला आहे.