Join us

मुंबईसह राज्याच्या अनेक शहरांमध्ये मोर्चे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 6:36 AM

मालेगावमध्ये कडकडीत बंद

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात गुरुवारी मुंबईसह राज्याच्या अनेक शहरे व जिल्ह्यांत निदर्शने झाली आणि मोर्चेही निघाले. आंदोलनाचे पडसाद गुरुवारी मुंबईतही उमटले. डाव्या चळवळीतील नेत्यांसह कार्यकर्ते, विद्यार्थी संघटनांचे कार्यकर्ते, अल्पसंख्याक समुदायातील कार्यकर्ते, आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते; असे असंख्य कार्यकर्ते ग्रॅण्ट रोड येथील आॅगस्ट क्रांती मैदानात गुरुवारी दुपारी तीन वाजल्यापासून एकत्र आले.ग्रॅण्ट रोड रेल्वे स्थानकापासून आॅगस्ट क्रांती मैदानापर्यंत ठिकठिकाणी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मैदानालगतचा मुख्य रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. केवळ मुंबईच नाही, तर मुंबईलगतच्या परिसरासह उत्तर भारतातील काही विद्यार्थी संघटना आणि विद्यापीठाचे विद्यार्थीही आंदोलनात सहभागी झाले होते.पुण्यामध्ये या कायद्याला पाठिंबा देण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने मोर्चा काढला. औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात कायद्यास विरोध करणाऱ्यांशी अभाविपच्या कार्यकर्त्यांची हाणामारीही झाली. मालेगावमध्ये मोर्चा काढून बंद पाळला.मालेगावमध्ये मुस्लीम समाजाने विराट मोर्चा काढला. या मोर्चाला वंचित बहुजन आघाडी, रिपाइं सेना, भारिप बहुजन संघ यांचा पाठिंबा होता. नाशिकमध्येही मोर्चा निघाला होता. लातूर, बीड, जालना, नांदेड, उस्मानाबाद, यवतमाळ, अमरावती, कोल्हापूरमध्येही डाव्या पक्षांनी तसेच विद्यार्थी संघटनांनी मोर्चे काढून कायद्याला विरोध दर्शवला.नागपूरमध्ये अनेक मुस्लीम संघटनांनी विधान भवनावर मोठा मोर्चा काढला. महाराष्ट्रात हे कायदे लागू करू नये, असे आवाहन मोर्चेकऱ्यांनी राज्य सरकारला केले.राजदंड पळविलाया कायद्याला विरोध करण्यासाठी जळगाव महापालिकेच्या सभेच्या वेळी शिवसेनेचे नगरसेवक इबा पटेल यांनी राजदंड पळविला. यावल व बोदवड (जि. जळगाव) येथेही मोर्चा निघाला. कायद्याला विरोध करणाºयांवर कारवाई करावी, या मागणीसाठी हिंदू जनजागरण मंचने मोर्चा काढला.