Join us

शेकापचा वीज मंडळावर मोर्चा

By admin | Published: June 26, 2015 1:45 AM

तालुक्यातील वारंवार वीज प्रवाह खंडित होण्याच्या वाढत्या प्रकारांमुळे शहरी व ग्रामीण भागांतील जनता हैराण झाली आहे. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी

भंडारा : सिकलसेल आजाराविषयी नागरिकांमध्ये भीती असून त्याबाबत न्यूनगंड आहे. आजाराची माहिती व्हावी व त्यावर वेळीच औषधोपचार करता यावा, यासाठी नागरिकांनी सिकलसेलची चाचणी करावी. प्रत्येक गटातील व्यक्तींनी आरोग्य विभागाला सहकारर्य करावे, असे प्रतिपादन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डोईफोडे यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय आरोग्य अभियान पुरस्कृत भारतीय औषधी अनुसंधान संस्था संचालित सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मंगळवारला भारतीय औषधी अनुसंधान संस्था भंडारा द्वारा आयोजित जागतिक सिकलसेल आजार नियंत्रण दिन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.भारतीय औषधी अनुसंधान संस्था व आरोग्य विभाग जिल्हा परिषद भंडारा तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र लेंडेझरी यांच्या विद्यमाने अरविंद विद्यालय बघेडा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रकल्प संचालक तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जेजूरकर यांनी विवाहपूर्वी सिकलसेल आजाराची तपासणी करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. शासनामार्फत प्राथमिक आरोग्य केंद, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालय येथे दररोज सिकलसेल चाचणी मोफत केली जाते. तसेच सिकलसेल पॉझिटीव्ह निघाल्यास ताबडतोब घरातील सर्व व्यक्तींचीसुद्धा सिकलसेल चाचणी करून घ्यावी, असे आवाहन केले. सिकलसेल आजार हा अनुवांशिक आजार आहे. तो सर्व समाजात कमी अधिक प्रमाणात सापडतो असे डॉ.कुरैशी यांनी सांगितले. सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आयईसी टेन्ट लावण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ.खेडीकर, डॉ.प्राची पातुरकर, डॉ.लुंगे, मीरा भट, डॉ.भजनकर आदींची उपस्थिती होती. संचालन नितीन वानखेडे यांनी, आभार डॉ.अश्विनी लांडगे यांनी केले. कार्यक्रमाकरिता चंदू वानखेडे, दिलीप खडतकर, अमोल डोंगरे, दीक्षा मानापुरे, विमल गवई, ममता लोखंडे व केंद्र लेंडेझरी आणि कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. (शहर प्रतिनिधी)