Join us

मुख्य सेविकांचा पदोन्नतीसाठी मोर्चा

By admin | Published: October 16, 2015 3:07 AM

एकात्मिक बालविकास योजनेचे काम करणाऱ्या मुख्य सेविकांचा अर्थात पर्यवेक्षिकांचा संवर्ग तत्काळ महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करण्याची मागणी करत महाराष्ट्र अंगणवाडी सहाय्यक

मुंबई : एकात्मिक बालविकास योजनेचे काम करणाऱ्या मुख्य सेविकांचा अर्थात पर्यवेक्षिकांचा संवर्ग तत्काळ महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करण्याची मागणी करत महाराष्ट्र अंगणवाडी सहाय्यक प्रकल्प अधिकारी व पर्यवेक्षिका संघाने बुधवारी आझाद मैदानात धडक मोर्चा काढला. ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत मुख्य सेविका महिला व बालविकास विभागाचे काम करत असल्याने पदोन्नतीला मुकत असल्याचा संघटनेचा आरोप आहे. पर्यवेक्षिकांवर लक्ष ठेवण्यासाठी वर्ग दोनमधील प्रकल्प अधिकाऱ्याचे पद शिक्षण, आरोग्य आणि पशुसंवर्धन खात्यांमधून भरली जात आहेत. या कर्मचाऱ्यांची शैक्षणिक पात्रता ही पयर्यवेक्षिकांपेक्षा कमी आहे. मात्र ग्रामविकास खात्याकडे असल्याने पदोन्नती मिळत नसल्याने पर्यवेक्षिकांना महिला व बाल विकास विभागाकडे वर्ग करून पदोन्नती देण्याची मागणी केली आहे. प्रकल्प विस्तार अधिकारी म्हणून काम करताना आरोग्य, ग्रामपंचायत आणि सांख्यिकी विभागातील अधिकाऱ्यांना ४ हजार २०० रुपये ग्रेड मिळत आहे. मात्र एकात्मिक बाल विकास योजनेचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना मात्र ४ हजार १०० रुपये ग्रेड पे मिळत आहे.