Fuel Hike : महागाईचा चटका ! पेट्रोल 13, तर डिझेल 11 पैशांनी महागलं
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2018 09:18 AM2018-09-13T09:18:00+5:302018-09-13T09:25:31+5:30
Fuel Hike : देशभर रोज वाढत चाललेल्या डिझेल व पेट्रोलच्या किमतींमुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे.
मुंबई : देशभर रोज वाढत चाललेल्या डिझेल व पेट्रोलच्या किमतींमुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे. आज पुन्हा इंधनांच्या दरवाढीचा चटका सर्वसामान्यांना सहन लागणार आहे. मुंबईमध्ये पेट्रोल 13 पैसे तर डिझेल 11 पैशांनी महागलं आहे. परिणामी, मुंबईत प्रति लिटर पेट्रोलसाठी ग्राहकांना 88.39 रुपये मोजावे लागणार आहेत तर डिझेलसाठी 77.58 रुपये माजावे लागणार आहेत.
दिल्लीकरांनाही इंधन दरवाढीचे चटके सहन करावे लागणार आहेत. दिल्लीतही पेट्रोलचे दर 13 आणि डिझेलचे दर 11 पैशांनी वधारले आहेत. पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये सतत वाढ होत असल्यानं सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. इंधनाचे दर वाढल्यानं माल वाहतूक महागली आहे. त्यामुळे सर्व वस्तूंच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. याचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे.
( ...तर डिझेल 50 आणि पेट्रोल 55 रुपयांत मिळेल- गडकरी )
Petrol at Rs 81.00/litre (increase by Rs 0.13/litre) and diesel at Rs 73.08/litre (increase by Rs 0.11/litre) in Delhi. Petrol at Rs 88.39/litre (increase by Rs 0.13/litre) and diesel at Rs 77.58/litre (increase by Rs 0.11/litre) in Mumbai. pic.twitter.com/hbCt2l0IJ7
— ANI (@ANI) September 13, 2018
दरम्यान, केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाकडून देशात पाच इथेनॉल निर्मितीचे कारखाने उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे डिझेल 50 आणि पेट्रोल 55 रुपये प्रति लिटर दरानं उपलब्ध होईल, असं केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. कचऱ्यापासून तयार करण्यात येणाऱ्या इथेनॉलमुळे इंधनाचे दर कमी होण्यास मदत होईल, असंदेखील गडकरी म्हणालेत. पण हे सर्व काही प्रत्यक्षात कधी होणार, असा प्रश्न जनता उपस्थित करत आहे.