Fuel Hike : इंधन दरवाढीचा भडका ! मुंबईकरांना पेट्रोलसाठी मोजावे लागणार 87.29 रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2018 07:39 AM2018-10-07T07:39:05+5:302018-10-07T07:59:44+5:30

Fuel Hike : इंधनातील दर कपातीनंतरही दरवाढीचे सत्र सुरूच आहे. आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली आहे.

Fuel hike: Petrol and Diesel prices in Mumbai are Rs 87.29 (increase by Rs 0.14) and Rs 77.06 (increase by Rs 0.31) | Fuel Hike : इंधन दरवाढीचा भडका ! मुंबईकरांना पेट्रोलसाठी मोजावे लागणार 87.29 रुपये

Fuel Hike : इंधन दरवाढीचा भडका ! मुंबईकरांना पेट्रोलसाठी मोजावे लागणार 87.29 रुपये

मुंबई - इंधनातील दर कपातीनंतरही दरवाढीचे सत्र सुरूच आहे. आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. मुंबईमध्येपेट्रोलचे प्रतिलिटर दर 0.14 पैशांनी वाढले आहेत तर डिझेलच्या दरात 0.31 पैशांनी वाढ झाली आहे. यामुळे मुंबईकरांना पेट्रोलसाठी 87.29 रुपये आणि डिझेलसाठी 77.06 रुपये मोजावे लागणार आहेत. तर नवी दिल्लीमध्ये पेट्रोलचे प्रतिलिटर दर 81.82 रुपये  (दरात 0.14 पैशांची वाढ) आणि डिझेलचे प्रतिलिटर दर 73.53 रुपये (दरात 0.29 पैशांची वाढ) एवढे झाले आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढणं सुरूच आहे.  इंधन दरवाढ आणि महागाईतून जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं मिळून पेट्रोलच्या दरात पाच रुपयांपर्यंत कपात केली. परंतु राज्य सरकारनं डिझेलचे दर जैसे थेच ठेवले होते. यानंतर राज्य सरकारनंही डिझेलच्या दरातही 1.5 रुपयांची कपात केल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं केलेली कपात मिळून डिझेल 4 रुपयांनी स्वस्त झालं होतं. मात्र इंधन दरवाढीचा भडका उडत आहेच. यामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत.  

(जेवढे कमावले...तेवढे झटक्यात गमावले...तरी पेट्रोलपंप चालक सुखावले)


केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी 2.5 रुपयांनी इंधनाचे दर कमी करण्याची घोषणा केली होती. तसेच राज्य सरकारांनाही आणखी 2.5 रुपयांनी पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याचे आवाहन केले. त्यानुसार महाराष्ट्र सरकारने लगेचच 2.5 रुपयांनी पेट्रोलचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला होता. इंधनाचा भडका आणि महागाईचा चटका सहन  करणारी देशातील जनता केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर नाराज आहे. पेट्रोलने ओलांडलेली नव्वदी आणि डिझेलने पार केलेला ऐंशीचा आकडा यामुळे अच्छे दिनच्या स्वप्नाची पार ऐशी तैशी झाल्याची भावना व्यक्त होत आहे. विरोधी पक्षही या मुद्यावरून सरकारवर टीकेची झोड उठवत आहेत. 

 

Web Title: Fuel hike: Petrol and Diesel prices in Mumbai are Rs 87.29 (increase by Rs 0.14) and Rs 77.06 (increase by Rs 0.31)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.