मुंबई - पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होण्याची मालिका सुरूच आहे. मुंबईमध्येपेट्रोलच्या दरात आज वाढ झालेली नाही. मात्र, डिझेलच्या दरात 9 पैशांनी वाढ झाली आहे. यामुळे मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी 88.18 प्रतिलिटर मोजावे लागणार आहेत, तर डिझेलचे प्रतिलिटर 79.11 रुपये एवढे आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये केंद्र सरकारने अडीच रुपयांंनी कपात करुन सर्वसामान्यांना दिलासा देण्यात आला होता खरा. मात्र त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढतच आहेत. एकूण महागाईमुळे सर्वसामान्यांचं जगणं कठीण झाले आहे. नवी दिल्लीमध्ये आज पेट्रोलचे प्रतिलिटर दर 82.72रुपये तर डिझेल दर 75.46 एवढे आहेत. डिझेलमध्ये 8 पैशांनी वाढ झाली आहे.
(Fuel Hike :इंधन दरवाढीमुळे जनता हैराण, नितीन गडकरींची कबुली)
दरम्यान, इंधनाच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे भाजीपाल्यासह सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. दरम्यानच्या काळात केंद्र व राज्य सरकारने इंधनाचे दर काही प्रमाणात कमी केले. परंतु, पेट्रोल-डिझेलची दरवाढ थांबलेली नाही. त्यामुळे सर्वसामान्यांचे महागाईने अक्षरश: कंबरडे मोडले आहे. गेल्या पाच दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये चढउतार होत आहेत. मात्र त्याचा परिणाम राज्यामध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होण्याऐवजी वाढतच आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
अच्छे दिनची खुमासदार चर्चाअच्छे दिनची स्वप्ने दाखवत केंद्र सरकारने निवडणुकीमध्ये मते पदरात पाडून घेतली. मात्र इंधनाच्या दरवाढीवर नियंत्रण न ठेवून देशातील सामान्यांचे कंबरडे मोडले. याासाठीच का अच्छे दिनचे गाजर आम्हाला दाखवले, अशा खुमासदार चर्चा सोशल मीडियामधून रंगत आहेत.
गेल्या काही दिवसांतील मुंबईतील पेट्रोल-डिझेलचे दर
तारीख | पेट्रोल/ प्रतिलिटर | डिझेल/ प्रतिलिटर |
10/15/2018 | 88.18 रुपये | 79.11 रुपये |
10/14/2018 | 88.18 रुपये | 79.02 रुपये |
10/13/2018 | 88.12 रुपये | 78.82 रुपये |
10/12/2018 | 87.94 रुपये | 78.51 रुपये |
10/12/2018 | 87.82 रुपये | 78.22 रुपये |
10/10/2018 | 87.73 रुपये | 77.93 रुपये |
10/09/2018 | 87.73 रुपये | 77.68 रुपये |