Fuel Price Hike : महागाईमुळे जनता होरपळतेय, मुंबईत पेट्रोलनं गाठली नव्वदी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 07:35 AM2018-09-24T07:35:47+5:302018-09-24T07:56:02+5:30
Fuel Hike : पेट्रोल-डिझेल वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य जनता महागाईमुळे जनता होरपळत आहे.
मुंबई - पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य जनता महागाईमुळे जनता होरपळत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आजही वाढ झाली आहे. पेट्रोल 11 पैशांनी तर डिझेल 5 पैशांनी महागले आहे. मुंबईत पेट्रोलनं नव्वदी गाठली आहे. म्हणजे मुंबईकरांना प्रति लिटर पेट्रोलसाठी 90.08 रुपये मोजावे लागणार आहेत.
मुंबईमध्ये पेट्रोल प्रतिलिटर 90.08 रुपये तर डिझेलचे दर प्रतिलिटर 78.58 रुपये एवढे झाले आहेत. तर नवी दिल्लीमध्ये पेट्रोल 82.72 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे दर 74.02 रुपये प्रतिलिटर एवढे झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. इंधन दरवाढीमुळे भाजीपाल्यासह अन्य वस्तूंचे दरदेखील वाढण्याची शक्यता आहे. दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होत असल्यानं सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे.
(Fuel Hike :इंधन दरवाढीमुळे जनता हैराण, नितीन गडकरींची कबुली)
Petrol & Diesel prices in #Delhi are Rs.82.72 per litre & Rs.74.02 per litre, respectively. Petrol & Diesel prices in #Mumbai are Rs.90.08 per litre & Rs.78.58 per litre, respectively. pic.twitter.com/LOwXRbJAOL
— ANI (@ANI) September 24, 2018
पेट्रोल-डिझेल वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य जनता महागाईने होरपळू लागली आहे. याविरोधात 10 सप्टेंबरला काँग्रेसनं भारत बंदची हाक दिली होती. या बंदला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. यानंतर केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेत देशवासीयांना इंधन दरवाढीमुळे होणाऱ्या त्रासाची सरकारला कल्पना असल्याचं म्हटलं होतं. मात्र इंधनाच्या दरात कपात करण्यास त्यांनी असमर्थतता दर्शवली. इंधनाचे दर सरकारच्या आमच्या हातात नाहीत, असं म्हणत त्यांनी हात वर केले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर वाढत असल्यानं सरकारला दर वाढवावे लागत असल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, दररोज वाढत चाललेल्या डिझेल व पेट्रोलच्या किमतींमुळे सर्वसामान्य जनतेचं कंबरडे मोडले आहे. महागाईमुळे जनता अक्षरशः मेटाकुटीला आली आहे. इंधन दरवाढीमुळे नागरिकांच्या संतापाचा भडका उडत आहे. देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज वाढत चालले असून, या दरवाढीचा सर्वाधिक फटका येथील वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे दैनंदिन जीवनात लागणाऱ्या इतर वस्तूंचेही भाव वाढत आहेत. इंधन दरवाढ कमी करण्याच्या दिशेने सरकारकडून काही ठोस पावले उचलण्यात येत आहेत का? कुठे आहेत अच्छे दिन?, असे संतप्त सवाल सर्वसामान्य जनतेकडून सरकारला विचारण्यात येत आहेत.