'कुठे आहेत अच्छे दिन?', इंधन दरवाढीवर देशवासियांचा संतप्त सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 08:26 AM2018-09-14T08:26:59+5:302018-09-14T08:27:02+5:30
दररोज वाढत चाललेल्या डिझेल व पेट्रोलच्या किमतींमुळे सर्वसामान्य जनतेचं कंबरडं मोडलं आहे. महागाईमुळे जनता अक्षरशः मेटाकुटीला आली आहे. इंधन दरवाढीमुळे नागरिकांच्या संतापाचा भडका उडत आहे.
मुंबई - दररोज वाढत चाललेल्या डिझेल व पेट्रोलच्या किमतींमुळे सर्वसामान्य जनतेचं कंबरडं मोडलं आहे. महागाईमुळे जनता अक्षरशः मेटाकुटीला आली आहे. इंधन दरवाढीमुळे नागरिकांच्या संतापाचा भडका उडत आहे. आजही इंधनाच्या दरांत वाढ झाली आहे. पेट्रोलच्या दरात 28 पैस आणि डिझेलच्या दरांमध्येही 24 पैशांची वाढ झाली आहे. देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज वाढत चालले असून, या दरवाढीचा सर्वाधिक फटका येथील वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे दैनंदिन जीवनात लागणाऱ्या इतर वस्तूंचेही भाव वाढत आहेत. दिल्लीतही पेट्रोलचे दर 28 आणि डिझेलचे दर 22 पैशांनी वधारले आहेत. इंधनाचे दर वाढल्यानं माल वाहतूक महागली आहे. त्यामुळे सर्व वस्तूंच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. महागाईचा जबरदस्त फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. इंधनाच्या दरांमध्ये कपात करण्यात यावी. याबाबत सरकार काय करत आहे?, कुठे आहेत अच्छे दिन?, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
Petrol and diesel prices in Mumbai are Rs 88.67/litre and Rs 77.82/litre respectively, locals say, "Don't know what the government is doing? It should reduce fuel prices. Achhe din kab aayenge?" pic.twitter.com/zCSIVQdxCF
— ANI (@ANI) September 14, 2018
#Maharashtra: Due to public agitation at Vasind, suburban trains arerunning up to Titwala only. Traffic remains affected between Titwala and Kasara: CPRO Central Railway
— ANI (@ANI) September 14, 2018
दरम्यान, केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाकडून देशात पाच इथेनॉल निर्मितीचे कारखाने उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे डिझेल 50 आणि पेट्रोल 55 रुपये प्रति लिटर दरानं उपलब्ध होईल, असं केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. कचऱ्यापासून तयार करण्यात येणाऱ्या इथेनॉलमुळे इंधनाचे दर कमी होण्यास मदत होईल, असंदेखील गडकरी म्हणालेत. पण हे सर्व काही प्रत्यक्षात कधी होणार, असा प्रश्न जनता उपस्थित करत आहे.