मुंबई : प्रवासीसंख्येत दोन लाखांनी घट झाल्यामुळे महसुलात घट होत असतानाच इंधन दरवाढीने बेस्ट उपक्रमाला आर्थिक खड्ड्यात घातले आहे. गेल्या काही दिवसांत सतत इंधनाच्या दरात चढउतार सुरू आहे. याचा फटका बेस्ट उपक्रमाला बसला असून वार्षिक २६ कोटी रुपये अतिरिक्त भार पडणार आहे. प्रवासीसंख्येत घट आणि इंधन दरवाढ यामुळे बेस्ट उपक्रमाला दररोज तब्बल एक कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागत असल्याचे समोर आले आहे. यामुळे बेस्ट उपक्रमाला टाळे लागण्याची शक्यता असल्याने इंधन दरात सवलत देण्याची मागणी जोर धरत आहे.इंधनाचे दर, बसगाड्यांचे सुटे भाग आणि आस्थापनावर बेस्ट उपक्रमाचा सर्वाधिक पैसा खर्च होत असतो. यामुळे बेस्ट उपक्रमाला मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा खर्च अधिक आहे. महिन्याभरात सतत वाढणाºया इंधनाच्या दराने भर घातली आहे. याचे तीव्र पडसाद बेस्ट समितीच्या बैठकीत गुरुवारी उमटले. बेस्ट बसगाड्यांच्या देखभालीचा खर्च, कर्मचाºयांचे वेतन यामुळे बेस्ट उपक्रमावर आर्थिक भार वाढत आहे. त्यामुळे पालिकेने आखून दिलेल्या कृती आराखड्याानुसार बेस्ट उपक्रमाने प्रवासी व कर्मचाºयांना देण्यात येणाºया सवलतींना कात्री लावली आहे.आर्थिक बचत करण्यासाठी बसगाड्या भाड्याने घेणे तसेच कंत्राटी कामगार घेण्याचे निर्णयही बेस्टने गेल्या काही महिन्यांमध्ये घेतले. मात्र इंधनाच्या दरात सतत वाढ होत असल्याने बेस्ट उपक्रमाचे आर्थिक गणित कोलमडले आहे. इंधनाच्या वाढत्या दरामुळे बेस्ट परिवहन विभागाला वार्षिक २६ कोटी रुपये अतिरिक्त भार पेलावा लागणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात सवलत देऊन बेस्ट उपक्रमाला मदत करावी. यासाठी बेस्ट समितीच्या अध्यक्षांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घ्यावी, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी बेस्ट समितीच्या बैठकीत केली.बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याची चर्चा बेस्ट समितीच्या गेल्या बैठकीत झाली होती. गेल्या काही वर्षांत बेस्ट तोट्यात असून योग्य नियोजन केले जात नाही.भविष्यात असाच कारभार सुरू राहिल्यास बेस्टला ठाळे ठोकावे लागेल. त्यामुुळे महाव्यवस्थापकपद रद्द करावे, अशी सूचना भाजपाचे नगरसेवक सुनील गणाचार्य यांनी आज केली.महसुलात एक कोटीची घटबेस्ट उपक्रमाला दररोज बसभाड्यातून तीन कोटी २५ लाख रुपये महसूल मिळत होता. मात्र प्रवासीसंख्येत घट, ई-तिकीटमध्ये घोळ यामुळे बेस्टला आता दोन कोटी २५ लाख रुपये महसूल मिळत आहे. त्यामुळे प्रवाशांबरोबर महसुलातही घट होऊन दररोज एक कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे, असे बेस्ट समिती सदस्यांनी निदर्शनास आणले.प्रवासीसंख्येत सात वर्षांमध्ये ४० टक्क्यांनी घट२००९-२०१० मध्ये ४३ लाख ७० हजार प्रवासीसंख्या, २०१८ मध्ये २५ लाख ९० हजार एवढे प्रवासी उरले आहेत.बेस्टच्या दर्शनी बाजूला असलेले इलेक्ट्रॉनिक बोर्ड बंद असणे, कंडक्टरकडे असणाºया ट्रायमेक्स मशीनमध्ये बिघाड, तिकीट प्रणाली सदोष, कमी झालेल्या बसफेºयांमुळे प्रवासीसंख्येत घट झाली आहे.बेस्टच्या प्रवासीसंख्येत वाढ करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बसगाड्यांची अचूक वेळ कळण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे.महापालिकेची शिफारसबेस्ट उपक्रमाने पाचशे बसमार्गांचे सुसूत्रीकरण करावे, यातून १०१ कोटी रुपयांची बचत होईल.जुन्या बसगाड्या बदलून मोठ्या वातानुकूलित बसगाड्या व २० आसनी मिनी बसगाड्या खरेदी करणे.बेस्ट उपक्रमाने आपला व्यावसायिक विकास आराखडा तयार करावा.अर्जित सुट्ट्यांचा पगार बंद करणे, भत्ते गोठवणे यातून वार्षिक ८९ कोटी रुपयांची बचत होईल. तसेच अधिकारी आणि कर्मचाºयांना बस पासवर देण्यात येणारी सवलत बंद करणे.
इंधन दरवाढीची बेस्टला झळ , वार्षिक २६ कोटी रुपयांचा अतिरिक्त भार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2018 2:24 AM