इंधन दराचा कल स्वस्ताईच्या वाटेवर
By admin | Published: October 5, 2014 02:04 AM2014-10-05T02:04:23+5:302014-10-05T02:04:23+5:30
गेल्या चार महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने घट दिसून आली आहे,
Next
>मुंबई : गेल्या चार महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने घट दिसून आली आहे, त्यातच आता आखाती देशांनीही पुरवठा वाढविल्याने याची परिणती तेलाच्या किमती प्रति बॅरल 92 डॉलर्पयत खाली उतरल्याने भारतात आगामी दोन महिन्यांत
पेट्रोल, डिङोल अशा महत्त्वाच्या इंधनाच्या दराचा कल घसरणीकडेच असेल, असे स्पष्ट झाले आहे. तेलाच्या किमतीचा हा 27 महिन्यांतील नीचांक आहे.
इराण आणि अमेरिकेतील
तणाव शिगेला पोहोचलेला असताना कच्च्या तेलाच्या किमतीने प्रति
बॅरल 13क् डॉलर्पयतची पातळी गाठली होती. मात्र, तुलनेने हा
तणाव निवळल्याने आणि एकूणच जागतिक बाजारातही सुधार दिसून आल्याने तेलाच्या किमतीत घसरण नोंदली गेली.
तेलाच्या किमती प्रति बॅरल 1क्6 डॉलरच्या आसपास आल्यानंतर भारतात पेट्रोल, डिङोल या दोन्ही इंधनांच्या किमतीत कपात होण्यास सुरुवात झाली. तेलाचे व्यवहार भविष्यवेधी कंत्रटपद्धतीने होतात. हे लक्षात घेता आता 92 डॉलर्पयत किमती कमी झाल्याने आगामी
दोन ते तीन महिन्यांच्या काळात पेट्रोल-डिङोल दोन्हीच्या किमतीमध्ये कपात होईल, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे.
आखाती देशांमधील तेल उत्खननाचे अनेक प्रकल्प कार्यान्वित झाल्यामुळे तेलाचा पुरवठा वाढला आहे.
परिणामी, आंतरराष्ट्रीय
बाजारात 92 डॉलर्पयत घसरलेल्या किमती 88 डॉलर्पयत कमी
होऊ शकतात, असे भाकीत या बाजारातील तज्ज्ञांनी वर्तविले आहे. असे झाल्यास भारताच्या दृष्टीने डोकेदुखीची बाब असलेल्या महागाईवर नियंत्रण आणण्यास मदत होणार आहे. (प्रतिनिधी)
च्एकीकडे इंधनावरील आयातीमुळे देशाच्या चालू खात्यातील वित्तीय तुटीमध्ये मोठय़ा प्रमाणावर कपात होऊन परकीय गंगाजळीत बचत होऊ शकते.
च्दुसरीकडे देशात येणा:या परकीय गुंतवणुकीमुळे अमेरिकी डॉलरच्या
तुलनेत भारतीय रुपयातही हळूहळू बळकटी दिसून येत आहे.
च्यामुळे इंधनाच्या किमती कमी होण्यासोबत महागाई नियंत्रणात येण्यासही मदत होणार आहे.