Join us

इंधन, टायर महागले; पण भाडे ‘जैसे थे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबईगेल्या काही दिवसांपासून इंधन दरात सातत्याने वाढ होत आहे, तर दुसरीकडे टायर आणि इतर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई

गेल्या काही दिवसांपासून इंधन दरात सातत्याने वाढ होत आहे, तर दुसरीकडे टायर आणि इतर खर्च वाढला आहे. मात्र, भाडेवाढ झालेली नाही. इंधन जीएसटी कक्षेत आणावे, अशी मागणी वाहतूकदारांनी केली आहे.

याबाबत जय भगवान ट्रान्स्पोर्ट असोसिएशनचे राजेंद्र वनवे म्हणाले की, प्रति टायर ५०० रुपये वाढले आहेत. इंधनवाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्या तुलनेत भाडेवाढ झालेली नाही. सध्या नुकसानीमध्ये काम सुरू आहे. वाहतूकदारांना दिलासा देण्यासाठी सरकारने डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणावे.

तर द फेडरेशन ऑफ बॉम्बे मोटार ट्रान्सपोर्ट ऑपरेटर्सचे सल्लागार बाल मालकीत सिंग म्हणाले की, डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे. टोल आहे. कर आहे. टायरही महागले आहेत. उत्पन्नात कोणतीही वाढ झाली नाही. आयडियल वेळ वाढला आहे. ज्या कालावधीमध्ये पूर्वी दिल्लीला तीन-साडेतीन फेऱ्या होत्या, आता दोन ते अडीच फेऱ्या होत आहेत. त्यामुळे सरकारने करात सवलत द्यावी, तसेच डिझेल इंधनाच्या कक्षेत आणावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.