मेट्रो -३ मध्ये इंधनाची होणार बचत

By Admin | Published: November 2, 2015 01:42 AM2015-11-02T01:42:48+5:302015-11-02T01:42:48+5:30

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या इकोफ्रेंडली मेट्रो ३ मार्गामुळे मोठ्या प्रमाणात इंधनाची बचत होणार असल्याचा दावा, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी केला आहे

Fuel will be saved in Metro -3 | मेट्रो -३ मध्ये इंधनाची होणार बचत

मेट्रो -३ मध्ये इंधनाची होणार बचत

googlenewsNext

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या इकोफ्रेंडली मेट्रो ३ मार्गामुळे मोठ्या प्रमाणात इंधनाची बचत होणार असल्याचा दावा, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी केला आहे. या प्रकल्पामुळे मुंबईकरांना आरामदायी प्रवासाचा आनंद घेता येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
टनलिंग असोसिएशन आॅफ इंडिया, केंद्रीय सिंचन व वीज महामंडळ, मुंबई मेट्रो रेल कॉर्पाेरेशन, इंडियन काँक्रीट इन्स्टिट्यूट, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पायाभूत सुविधा भुयारीकरणाची आव्हाने या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय कार्यशाळेत भिडे बोलत होत्या. या वेळी त्या म्हणाल्या की, जगभरात उपलब्ध असलेल्या उत्तम तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यावरणस्नेही मेट्रो प्रकल्प उभारण्याचा आमचा मानस आहे. मुंबईकरांना मेट्रो ३ चा लाभ लवकरात लवकर घेता यावा, यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने जबाबदारी घेतली आहे. यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. या कार्यशाळेमुळे जगभरातील उत्तम तंत्रज्ञानाची माहिती अवगत झाल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Fuel will be saved in Metro -3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.