फरार कोरोनाबाधित चोराला अटक; रेल्वे पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2022 09:36 AM2022-09-18T09:36:26+5:302022-09-18T09:36:52+5:30

आरोपीची ओळख साहिल लुफ्तार शेख (वय ३५) अशी असून त्याला १३ सप्टेंबर रोजी दक्षिण मुंबईतील मस्जिद रेल्वे स्थानकावरून सीएसएमटी पोलिसांनी मोबाइल चोरी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती

Fugitive corona infected thief arrested; Action of Railway Police | फरार कोरोनाबाधित चोराला अटक; रेल्वे पोलिसांची कारवाई

फरार कोरोनाबाधित चोराला अटक; रेल्वे पोलिसांची कारवाई

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : मोबाइल चोरीच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केलेल्या आणि कोरोना बाधित आढळून आलेल्या चोराने शनिवारी पहाटे सरकारी रुग्णालयातून पळ काढला,  पण नंतर त्याला रेल्वे पोलिसांनी अटक केली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. 

आरोपीची ओळख साहिल लुफ्तार शेख (वय ३५) अशी असून त्याला १३ सप्टेंबर रोजी दक्षिण मुंबईतील मस्जिद रेल्वे स्थानकावरून सीएसएमटी पोलिसांनी मोबाइल चोरी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.  तक्रारदार राजकुमार पटेल (३१) हा डिलिव्हरी बॉय दुपारी सीएसएमटीवरून ट्रेनमध्ये चढला होता. लोकल मस्जिद बंदर जवळ पोहोचली तेव्हा त्याच डब्यातील शेख याने पटेल याचा फोन हिसकावून पळ काढला. पटेल ट्रेनमधून खाली उतरला आणि सह प्रवाशांच्या मदतीने शेखला पकडले, नंतर त्याला रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले, रे रोड येथील रहिवासी असलेल्या शेखवर आयपीसी कलम ३९२ (दरोडा) अंतर्गत गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली होती. परंतु, त्याच्या वैद्यकीय तपासणीदरम्यान, शेख कोविड-१९ पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्याला १५ सप्टेंबर रोजी तत्काळ सेंट जॉर्ज रुग्णालयात हलविण्यात आले. शनिवारी पहाटे ३ ते ३.१५ च्या दरम्यान तो बाहेर पडला. हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावरील स्वच्छतागृहाच्या  खिडकीच्या तीन लाकडी पट्ट्या काढून त्याने हातकड्या काढून पोबारा केला. 

चोर पळाल्याचे पोलिसांच्या लक्षात येताच शहरातील पोलीस वर्तुळात संदेश देण्यात आला. शेख हाजी अली परिसरात दिसत असल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली. पोलीस निरीक्षक मोरे यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्यांना पुन्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. 

Web Title: Fugitive corona infected thief arrested; Action of Railway Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.