फरार खलिस्तानी अतिरेक्याला मुंबईत आणले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:07 AM2020-12-24T04:07:14+5:302020-12-24T04:07:14+5:30
दिल्ली विमानतळावर अटक : एनआयएची कारवाई लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : खलिस्तान चळवळीशी संबंधित पुण्यात दाखल गुन्ह्यातील फरार ...
दिल्ली विमानतळावर अटक : एनआयएची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : खलिस्तान चळवळीशी संबंधित पुण्यात दाखल गुन्ह्यातील फरार संशयित दहशतवादी गुरजीतसिंग निज्जर याला राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) नवी दिल्ली विमानतळावर साेमवारी अटक केली. सायप्रस (युरोप) येथून भारतात परतला असताना, त्याच्यावर कारवाई केली असून, त्याला मुंबईला आणण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
खलिस्तान चळवळ पुनर्जीवित करण्याबाबत कट रचणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे आदींबाबत एनआयएने गेल्या वर्षी पुण्यात गुन्हा दाखल केला होता. यामध्ये गुरजीतसिंग निज्जर हा मुख्य सूत्रधार असून, तो फरार होता. इंटरनॅशनल (बीकेआय) संबंधित ‘खालिस्तान’ चळवळीत सहभागी होण्यासाठी प्रेरित करण्याच्या उद्देशाने ताे परतणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने त्याला दिल्ली विमानतळावर सोमवारी अटक केली. ट्रान्झिस्ट रिमांड घेऊन त्याला मुंबईत आणण्यात आले आहे.
........................