Join us

फरार दरोडेखोराला १५ वर्षांनंतर अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 7:22 AM

गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई : शंभरहून अधिक गुन्ह्यांची नोंद

मुंबई : शंभरहून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या आणि दहिसरमधील एका हिऱ्याच्या कारखान्यात दरोडा घालण्यासाठी आलेल्या टोळीच्या १५ वर्षांपासून फरार असलेल्या म्होरक्याला गुरुवारी मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या. संतोष गोपाल नायर (५१) असे अटक आरोपीचे नाव असून गुन्हे अन्वेषण शाखेच्या कक्ष १२ ने पुण्यातून त्याला अटक केली.

नायर हा सराईत गुन्हेगार असून गेल्या १५ वर्षांपासून फरार आहे. त्याला पकडण्यासाठी कक्ष १२ चे पोलीस उपनिरीक्षक हरीश पोळ यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करण्यात आले होते. मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे पोलीस आयुक्तालय कार्यालयातून पोळ आणि त्यांच्या पथकाने नायरबाबत सर्व माहिती गोळा केली. यात त्याची कार्यपद्धती, साथीदार, लपण्याची ठिकाणे आणि नातेवाईक या सर्वांचा समावेश होता. त्याचा अभ्यास करताना नायर हा पुण्यात लपल्याची माहिती पोळ यांच्या हाती लागली. त्यानुसार कक्ष १२ चे प्रभारी सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखालील पथक पुण्यात रवाना झाले. तेथून तपासाअंती त्यांनी नायरला अटक केली. मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईत त्याच्यावर चोरी, दरोड्याचा प्रयत्न आणि घरफोडीसारखे शंभर गुन्हे दाखल असल्याचे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्याने आणखी काही गुन्हे केले आहेत का, याची चौकशी सध्या कक्ष १२ करीत आहे.अखेर पोलिसाच्या तपासास यशदहिसर पोलिसांच्या हद्दीत एका हिºयांच्या कारखान्यात दरोडा टाकण्यासाठी नायर आणि त्याची टोळी ८ मार्च, २०१९ रोजी गेली होती. मात्र दहिसर पोलिसांनी त्यांचा हा डाव उधळून लावत चौघांना अटक केली. त्यांच्याकडून एक चिनी बनावटीचे पिस्तूल, चार जिवंत काडतुसे, दोन चॉपर आणि पांढºया रंगाची चोरीची कारही हस्तगत केली होती. त्या वेळी नायर फरार होण्यात यशस्वी झाला. त्याला अटक करण्यासाठी पोलीस प्रयत्नशील होते. मात्र, तो त्यांच्या हाती लागत नव्हता. अखेर त्याच्या अटक साथीदारांच्या चौकशीत नायरबाबतची माहिती गुन्हे शाखेला मिळाली व फरार नायरला अटक करण्यात पोलिसांना यश आले.